‘तो सूड नव्हता तर…’; Operation Sindoor बाबत भारतीय सैन्याचा नवा व्हिडिओ समोर

'तो सूड नव्हता तर न्याय होता', असे सांगणारा Operation Sindoor बाबत भारतीय सैन्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम कमांडच्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरून व्हिडिओ जारी करण्यात आला असून ऑपरेशन सिंदूरबाबत भाष्य करण्यात आले आहे.

104

‘तो सूड नव्हता तर न्याय होता’, असे सांगणारा Operation Sindoor बाबत भारतीय सैन्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम कमांडच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून व्हिडिओ जारी करण्यात आला असून ऑपरेशन सिंदूरबाबत भाष्य करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताच्या लष्करी ताकदीचे दर्शन संपूर्ण जगाला झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता ऑपरेशन सिंदूरबाबतच्या लष्करी कारवाईचे काही व्हिडिओ भारतीय सैन्यदलाकडून जारी करण्यात आले होते.

दरम्यान, भारतीय लष्कराने जारी केलेल्या व्हिडिओतून ऑपरेशन सिंदूर कशाप्रकारे राबविण्यात आले आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांना कशापध्दतीने लक्ष्य करण्यात आले याची माहिती व्हिडिओद्वारे देण्यात आली आहे. त्यातच आता जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याचा एक जवान म्हणाले, तो(ऑपरेशन सिंदूर) सूड नव्हता तर न्याय होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झालेल्या कारवाईद्वारे असा धडा शिकवायचा होता, त्यांच्या भावी पिढ्यांदेखील भारतीय लष्करी कारवाई लक्षात ठेवतील, असेही जवानाने व्हिडिओत म्हटले आहे.

(हेही वाचा ‘Operation Sindoor’ स्थगित असतानाच भारतीय सैन्यदलाला आणखी ४० हजार कोटींची संरक्षण सामुग्री )

ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नसून पाकिस्तानसाठी एक धडा आहे जो त्यांनी दशकभरापासून मिळाला नव्हता, असे भारतीय सैन्याकडून जारी करण्यात आलेल्या ‘एक्स’वरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे. एकंदरीत, भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईचे पुरावे आता एक-एक करून लष्कराकडून जारी करण्यात येत आहेत. भारतीय सैन्यदलांच्या शौर्य आणि धाडसी कारवाईचा प्रतीक म्हणून ऑपरेशन सिंदूरचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Operation Sindoor का राबविण्यात आले?

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरदाखल भारतीय सैन्यदलाकडून Operation Sindoor अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात आलं. भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानातील ०९ दहशतवादी तळांना नेस्तानाबूत करण्यात आले असून १००हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. भारताच्या तिन्ही सैन्यदलांकडून पत्रकार परिषदेत यांसदर्भात पुराव्यांसह माहिती देण्यात आली होती. सैन्यदलांच्या डीजीएमओंनी दिलेल्या माहितीनुसार, मुरीदके, बहावलपूर आणि सरगोधा या एअरबेसचं मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.