Solapur शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागून दुर्घटना घडली आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप काही जण त्या कारखान्यात अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अडकलेल्यांमध्ये कारखान्याच्या मालकासह कुटुंबाचा समावेश आहे. (Solapur)
(हेही वाचा – ‘Operation Sindoor’ स्थगित असतानाच भारतीय सैन्यदलाला आणखी ४० हजार कोटींची संरक्षण सामुग्री)
दिवसभर आग धुमसत असून अग्निशमन दल आग आटोक्यात करण्याचा प्रयत्न करत आहे. सेंट्रल टेक्सटाईल मिल (Central Textile Mill) या टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला शनिवारी मध्यरात्री सुमारे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. रविवारी सकाळपर्यंत ही आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नव्हती.
दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू
अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत तिघांना बाहेर काढले, मात्र आगीमुळे गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यात काही मृतांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी (वय 78), अनस मन्सूरी (वय 24), शिफा मन्सूरी (वय 23) आणि 1 वर्षांचा बालक युसूफ मन्सूरी हे चौघे आत अडकल्याची शक्यता आहे.
उत्पादित टॉवेलसह त्यासाठी लागणारे सूत, दोरी, रसायन, कागदी पुठ्ठे आदी माल कारखान्यात मोठ्या प्रमाणावर होता. कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी हे कुटुंबीयांसह कारखाना इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहतात. आगीत मालकासह मन्सुरी कुटुंबातील पाच ते सहाजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन यंत्रणेकडून नेटाने प्रयत्न सुरू होते. या कुटुंबीयांचा आवाज दुपारी उशिरापर्यंत बाहेर ऐकू येत होता.
(हेही वाचा – Amity International Business School चा रॅंक कितवा आहे? आणि का आहे या संस्थेचा जगभरात बोलबाला?)