अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या ‘ले लीडर्सच्या सल्लागार मंडळात’ नियुक्त झालेल्या दोन व्यक्तींची पार्श्वभूमी दहशतवादाशी संबंधित आहे. त्यामुळे आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षां(Donald Trump)च्या व्हाईट हाऊसमध्ये दहशतवादाशी संबंधित व्यक्तींचा शिरकाव झाला आहे. दि. १६ मे २०२५ रोजी व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये, इस्माईल रॉयर आणि शेख हमजा युसूफ ही दोन नावे समोर आली आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात Donald Trump यांच्यावर पुन्हा एकदा रोष उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.
(हेही वाचा भाजपा आमदार Sanjay Upadhyay यांचा हल्लाबोल )
दरम्यान, अमेरिकन पत्रकार लॉरा लूमर यांनी यासंदर्भात खुलासा केला असून ह्या दोन्ही व्यक्ती पूर्वी जिहादी कारवायांमध्ये सहभागी होत्या आणि त्यापैकी एक जण प्रशिक्षणासाठी लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी छावणीत गेला होता असे त्या म्हणाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, इस्माईल रॉयर, ज्याला पूर्वी रँडल रॉयर म्हणून ओळखले जात असे. त्याने पाकिस्तानला प्रवास करून एका इस्लामिक दहशतवादी छावणीत प्रशिक्षण घेतले.
त्याचबरोबर, इस्माईल रॉयरला जिहादी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणे, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कटात सहभागी होणे आणि हिंसक गुन्ह्यांमध्ये स्फोटके आणि शस्त्रे वापरणे या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. याअंतर्गत रॉयरला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षादेखील सुनावण्यात आली होती. या नियुक्तीबाबत आता अमेरिकेत सुरक्षा आणि नैतिकतेशी संबंधित अनेक प्रश्नही उपस्थित केले जात असल्याचे समोर आले आहे.
EXCLUSIVE:
🚨 2 jihadists have been appointed to the White House Advisory Board of Lay Leaders, Announced Today on the official White House website 🚨
Ismail Royer and Shaykh Hamza Yusuf co-founder of Zaytuna College are both listed despite their affiliations with Islamic… https://t.co/QdKMI5V3Md pic.twitter.com/L04Jq9JwwB
— Laura Loomer (@LauraLoomer) May 17, 2025
पत्रकार लॉरा लूमर यांनी काय म्हटलं?
पत्रकार लॉरा लूमर यांच्या मते, इस्माईल रॉयरने २००४ ते २०१७ दरम्यान इस्लामिक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल १३ वर्षे तुरुंगवास भोगला होता. लूमर यांचा दावा आहे की, रॉयर केवळ अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारू इच्छित नव्हता, तर ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखालील दहशतवादी संघटना अल-कायदालाही पाठिंबा देत होता. विशेष म्हणजे हा इस्लामी दहशतवादी अफगाणिस्तानातील तालिबानलाही पाठिंबा देऊ इच्छित होता आणि ‘व्हर्जिनिया जिहाद नेटवर्क’मध्येही तो महत्त्वाची भूमिका बजावत होता, असेही पत्रकार लॉरा लूमर म्हणाल्या.Donald Trump
Join Our WhatsApp Community