केवळ कायदे नव्हे, तर हिंदुविरोधी व्यवस्था पालटायला हवी; अधिवक्ता Vishnu Shankar Jain यांची मागणी

43
केवळ कायदे नव्हे, तर हिंदुविरोधी व्यवस्था पालटायला हवी; अधिवक्ता Vishnu Shankar Jain यांची मागणी

‘कायदे नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थाच हिंदुविरोधी आहे. यासाठीच केवळ कायदे नव्हे, तर संपूर्ण व्यवस्था पालटायला हवी’, अशी मागणी अधिवक्ता विष्णु शंकर जैन (Vishnu Shankar Jain) यांनी केली आहे. रविवार, १८ मे या दिवशी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Solapur Fire : अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये भीषण आग, तीन कामगारांचा मृत्यू)

देशातील व्यवस्था हिंदु विरोधी !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन (Vishnu Shankar Jain) म्हणाले की, ‘हिंदुंवर झालेल्या अनेक आघातांविषयीचे खटले अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्यांचे निर्णय व्हायला किती वेळ लागणार हे आपल्या सर्वांना निर्धारित करायचे आहे. आज देशातील व्यवस्था हिंदु विरोधी आहे. वक्फविषयी जेव्हा संसदेत कायदा पारित झाला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात याविरोधात प्रविष्ट झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय विचार करते की हा कायदा कसा थांबवला जाईल; परंतु संसदेने पारित केलेला कायदा थांबवताच येत नाही. हिंदूंच्या विरोधात नकळतपणे प्रचंड कायदे निर्माण केले गेले आहेत. कलम २९-३० मध्ये अनेक असंविधानिक त्रुटी आहेत. कलम २६ प्रमाणे मशिदी, चर्च मात्र अधिग्रहणापासून सुटतात, मात्र हिंदूंची मंदिरे अधिग्रहण होताना कलम २६ गुंडाळले जाते. शिवाचे मंदिर पडण्याचे आदेश देतांना देहली उच्च न्यायालय म्हणते की भगवान शिवाने आम्हाला क्षमा करावी ! आज देशातील सहस्रो अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये दिलेल्या सुविधा मिळवण्यासाठी लोक धर्मपरिवर्तन करून प्रवेश घेत आहेत. यातून असे लक्षात येते की, कायदे नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थाच हिंदुविरोधी आहे. यासाठीच केवळ कायदे नव्हे, तर संपूर्ण व्यवस्था पालटायला हवी.

देहली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांच्या घरात मोठी रक्कम सापडते, पण ते स्वतः म्हणतात की न्यायाधीशाचे पद सोडणार नाही. असे न्यायाधीश असतील, तर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते कसे लढू शकतील ? आपल्या आस्थाकेंद्रांसाठी आपण अतिशय सहिष्णू, शांत आहोत. आपली आस्थाकेंद्रे मुक्त व्हायला हवीत अशी एकमुखी मागणी आपण सर्वांनी करूया ! असे आवाहनही विष्णु शंकर जैन (Vishnu Shankar Jain) यांनी केले.

(हेही वाचा – Sanatan Sanstha : समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करावे लागेल; प. पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन )

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे आभार!

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात शनिवारपासून पासून मला अनुभूती होत आहे की, येथे हिंदु राष्ट्राचा मोठा इतिहास रचला जात आहे. आम्ही वर्ष २०१३ मध्ये हिंदु राष्ट्र अधिवेशनात आलो होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद घेतले. आमचा हिंदुत्वनिष्ठांसाठीचा हा लढा आज प्रचंड व्यापक झाला आहे तो गुरुदेवांच्या आशीर्वादामुळेच ! सनातन संस्था, महर्षिअध्यात्म विश्वविद्यालय या संस्था पुढे जाऊन मोठी आध्यात्मिक केंद्रे होतील. समस्त हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मी आभार मानतो, अशी भावना अधिवक्ता विष्णु शंकर जैन (Vishnu Shankar Jain) यांनी व्यक्त केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.