चिनी हॅकर्सनी (Chinese Hackers) सरकारी वेबसाइट्सना सट्टेबाजीचे एक नवीन शस्त्र बनवले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), इंडिया पोस्ट आणि नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस) सारख्या साइट्सद्वारे आयपीएल बेटिंग लिंक्स पाठवल्या जात आहेत. तुम्ही या सरकारी वेबसाइट्स सामान्यपणे उघडता तेव्हा या लिंक्स दिसत नाहीत. परंतु, जर तुम्ही जाहिरातीत किंवा बेटिंगसाठीच्या संदेशात सरकारी वेबसाइटचे डोमेन असलेली कोणतीही लिंक मिळाली तर सावध राहा. (Chinese Hackers)
नेटवर्क कसे काम करते ?
असे यासाठी केले जाते की, लोकांचा सरकारी वेबसाइटवर विश्वास आहे. हे संपूर्ण नेटवर्क चीनमधून चालत आहे. सट्टेबाजीचे पैसे क्रिप्टोद्वारे चीन-पाकिस्तानला पाठवले जात आहेत. मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांच्या साइटवरही या लिंक उपलब्ध आहेत. जेव्हा वापरकर्ता या लिंक्सद्वारे साइटवर पोहोचतो तेव्हा गेमिंग पेज थेट उघडते. येथे ॲप डाऊनलोड केले जाते. त्यानंतर वापरकर्त्याला टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले जाते. ग्रुपमध्ये बेटिंग रेट आणि ऑफर्स मिळतात. सुरुवातीला मोफत बोनस टोकन मिळते. मग किमान १० हजार रु. जमा करावे लागतात. याद्वारे वापरकर्ता १ लाख रुपयांपर्यंत सट्टेबाजी करू शकतो. (Chinese Hackers)
सरकारी वेबसाइट्सवरून डेटा चोरतात
गेल्या दोन वर्षांपासून असे हल्ले सतत होत आहेत. केंद्रीय सायबर सुरक्षेतील सीईआरटी एजन्सी सतत अलर्ट पाठवतात. काही काळासाठी वेबसाइट्स सुधारल्या जातात, परंतु काही काळानंतर परिस्थिती पूर्वीसारखीच होते. सीईआरटीनुसार, सरकारी वेबसाइटवर सुमारे ५०० बेटिंग लिंक्स आहेत. हॅकर्स सरकारी वेबसाइट्सवरून डेटा चोरतात, विकतात किंवा ओपन सोर्सवर टाकत आहेत. (Chinese Hackers)
सरकारी साइट्सवर लिंक
site:*.GOV.IN/* betting Mahadev टाकल्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) साइटवर सात प्रकारच्या बेटिंग अॅप्स लिंक आहेत. त्यात रमी व लुडो आहे. मध्य प्रदेश. सरकारच्या पोर्टलवरही रमी, लुडो आणि बेटिंगच्या ७ अॅप्सची लिंक डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. हरियाणा सरकारच्या वेबसाइटवर स्पिन खेळाची लिंक आहे. यात २०० रु. फीसह सामील होणे किंवा मित्रांना आमंत्रित केल्यावर ५० रु. बोनस ऑफर केले जाते. संवाद मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर एका गेमची लिंक आहे. छत्तीसगड सरकारची वेबसाइट rda.cgstate.gov.in वर777 गेमच्या लिंक आहेत. अशा लिंक राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटवरही आढळल्या आहेत. (Chinese Hackers)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community