Israel attacks Gaza : इस्रायलचा गाझा पट्टीत पुन्हा हल्ला ! १४६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू , तर ४५९ जण जखमी

Israel attacks Gaza : इस्रायलचा गाझा पट्टीत पुन्हा हल्ला ! १४६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू , तर ४५९ जण जखमी

57

इस्रायलने गाझा (Israel attacks Gaza) पट्टीत गेल्या २४ तासांमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये १४६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला तर ४५९ जण जखमी झाल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. मार्चमध्ये युद्धबंदी मोडल्यानंतर गुरुवारपासून इस्रायलने गाझावरील हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत. (Israel attacks Gaza)

हेही वाचा-Solapur Fire : अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये भीषण आग, तीन कामगारांचा मृत्यू

गाझात मध्यरात्रीपासून ५८ जणांचे मृतदेह आढळले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती उत्तर गाझा येथील इंडोनेशियन रुग्णालयाचे संचालक मारवान अल सुल्तान यांनी दिली. गेल्या १९ महिन्यांच्या युद्धादरम्यान इस्रायल सैन्याने केलेल्या हल्ल्यांत रुग्णालयांचेच नुकसान झाले असून मार्चमधील नाकेबंदीनंतर वैद्याकीय सामग्रीपुरवठा बाधित झाला असल्याचे ते म्हणाले. (Israel attacks Gaza)

हेही वाचा- ‘Operation Sindoor’ दरम्यान भारताच्या रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या वापराने जग अवाक्, नेमकं काय घडलं जाणून घ्या

हमासला पराभूत करणे आणि ओलिसांची सुटका करणे याच उद्देशातून ‘ऑपरेशन गिडॉन वॅगन्स’ सुरू केल्याचे इस्रायलने सांगितले. इस्रायली लष्कराने शुक्रवारी, उत्तरेकडील बेत लाहिया शहर आणि जबालिया निर्वासित छावणीवर केलेल्या जोरदार हल्ल्यांनंतर गाझाच्या नागरिकांना दक्षिणेकडे जाण्याचे आदेश दिले. तथापि, नागरिकांनी खान युनूस शहराकडे जाण्याचा मार्ग पत्करला असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Israel attacks Gaza)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.