India-Bangladesh Trade : युनूस सरकारला भारताचा मोठा झटका ! बांगलादेशमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर लादले 'बंदर निर्बंध'
बांगलादेशच्या (India-Bangladesh Trade) अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी चीनमध्ये केलेल्या एका वादग्रस्त विधानानंतर भारताने मोठा झटका दिला आहे. तयार कपड्यांपासून प्रक्रिया केलेल्या अन्नापर्यंत अनेक वस्तूंवर बंदर निर्बंध लादल्याने युनूस यांच्या दाव्यांना भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. एका कार्यक्रमात बोलताना, ज्यामध्ये त्यांनी बांगलादेश हा या प्रदेशातील हिंदी महासागराचा एकमेव संरक्षक असल्याचेही म्हटले होते. युनूस यांनी चीनला बांगलादेशमार्गे जगभरात वस्तू पाठवण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या या विधानांवर नवी दिल्लीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भारतातील राजकीय नेत्यांनीही यावर जोरदार टीका केली होती. (India-Bangladesh Trade)
Textile 🎯
India limits Bangladesh port import of GARMENTS, processed food etc..
या संदर्भात वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या विदेश व्यापार महासंचालनालयाने (DGFT) अधिसूचना जारी केली आहे. भारताने शनिवारी बांगलादेशमधून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर बंदर निर्बंध लादले आहेत. यामध्ये तयार कपडे आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. मंत्रालयाने सांगितले की, अधिसूचनेद्वारे बांगलादेशमधून भारतात आयात होणाऱ्या काही वस्तू जसे की तयार कपडे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ इत्यादींवर बंदर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तथापि बांगलादेशमधून भारतातून भूतान आणि नेपाळकडे जाणारे सामान या बंदर निर्बंधातून वगळण्यात आले आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (India-Bangladesh Trade)
BIG BREAKING:
India limits Bangladesh garment imports to Kolkata, Mumbai seaports; Land ports closed in a reciprocal gesture to Bangladesh
यापूर्वी 9 एप्रिल रोजी भारताने बांगलादेशला मध्य पूर्व, युरोप आणि नेपाळ व भूतान वगळता इतर अनेक देशांमध्ये विविध वस्तू निर्यात करण्यासाठी दिलेली ‘ट्रांसशिपमेंट’ सुविधा (इतर देशांमार्गे मालाची वाहतूक करण्याची सोय) मागे घेतली होती. आदेशानुसार बांगलादेशमधून तयार कपड्यांची आयात कोणत्याही भूमार्गावरील बंदरातून करता येणार नाही. ती फक्त न्हावा शेवा आणि कोलकाता या समुद्रमार्गावरील बंदरांमधूनच करता येईल. (India-Bangladesh Trade)
India restricts trade from Bangladesh in what is a reciprocal measure (🇧🇩 restricted 🇮🇳 cotton, Rice). Land ports closed for Bangladeshi ready made garments, direct trade with India’s north east restricted.
या बंदर निर्बंधात बांगलादेशमधून होणारी मासे, एलपीजी, खाद्यतेल आणि क्रश्ड स्टोनची आयात समाविष्ट नाही असेही अधिसूचनेत नमूद केले आहे. हे बदल करण्यासाठी, देशाच्या आयात धोरणात बांगलादेशमधून भारतात होणाऱ्या या वस्तूंच्या आयातीला नियंत्रित करण्यासाठी एक नवीन परिच्छेद तात्काळ प्रभावाने समाविष्ट करण्यात आला आहे, असेही म्हटले आहे. (India-Bangladesh Trade)
फळे, फळांचे फ्लेवर असलेले आणि कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (बेकरी उत्पादने, स्नॅक्स, चिप्स आणि मिठाई), कापूस आणि कापूस धाग्याचा कचरा, प्लास्टिक आणि पीव्हीसी तयार वस्तू, रंग, प्लास्टिसायझर्स आणि ग्रॅन्युल्स, आणि लाकडी फर्निचर या वस्तूंसाठी अधिसूचनेत म्हटले आहे की, शेजारील देशातून येणाऱ्या या खेपांना आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील कोणत्याही एलसीएस (लँड कस्टम्स स्टेशन्स) आणि आयसीपी (इंटिग्रेटेड चेक पोस्ट्स) तसेच पश्चिम बंगालमधील एलसीएस चांग्राबांधा आणि फुलबारी मार्गे परवानगी दिली जाणार नाही. (India-Bangladesh Trade)