सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात शनिवारी रात्री कारखान्याला भीषण आग (Solapur Fire) लागली. यामध्ये तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळते आहे. (Solapur Fire)
हेही वाचा-इसिसच्या गुप्तहेराला उत्तर प्रदेशात अटक, Operation Sindoor बाबत शत्रूला देत होता महत्त्वाची माहिती
चार तास उलटून गेल्यानंतरही ही आग विझलेली नाही. कारखान्यात आणखी पाच ते सहा कामगार अडकून पडल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या कारखान्याचे मालक याठिकाणीच राहत होते. त्यांच्या कुटुंबातील काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Solapur Fire)
अग्निशमन दलाने आगीतून आतापर्यंत तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले होते. तर अद्याप ही 5-6 जण कारखान्यात अडकल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात आहे. या कारखान्यात टॉवेल तयार केले जायचे. या साहित्यामुळे आग पसरत गेल्याचे समजते. ही आग इतकी भीषण होती की, रात्री संपूर्ण परिसर आगीच्या ज्वालांनी वेढला गेला होता. सकाळ झाल्यानंतरही आग पूर्णपणे विझलेली नाही. आजुबाजूच्या अग्निशमन दलावरील गाड्या घटनास्थळी बोलवण्यात आल्या आहेत. (Solapur Fire)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community