‘ही चांगली डिप्लोमसी, पाकिस्तान दहशतवादी देश हे जगात प्रस्थापित होईल’; शिष्टमंडळाच्या निर्णयावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

'ही चांगली डिप्लोमसी, पाकिस्तान दहशतवादी देश हे जगात प्रस्थापित होईल', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी माध्यमांना दिली. भारत सरकारने पाकिस्तान युध्दानंतर जगासमोर आपले विचार मांडण्यासाठी शिष्टमंडळ स्थापन केले आहे.

72

‘ही चांगली डिप्लोमसी, पाकिस्तान दहशतवादी देश हे जगात प्रस्थापित होईल’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी माध्यमांना दिली. भारत सरकारने पाकिस्तान युध्दानंतर जगासमोर आपले विचार मांडण्यासाठी शिष्टमंडळ स्थापन केले आहे. भारत सरकारकडून ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती जगासमोर मांडण्याकरिता २२ मे रोजी शिष्टमंडळ पाठविण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही एक चांगली बातमी आहे. खरी न्यूज विविध लोकांपर्यंत, विविध देशांपर्यंत पोहोचली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

(हेही वाचा ‘Tulbul Navigation Project’ पूर्ण करण्याची वेळ आलीय का?; जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पक्षांमध्ये खडाजंगी, वाचा संपूर्ण बातमी )

दरम्यान, ही एक चांगली डिप्लोमसी असून यामुळे भारताची भूमिका आणि भारत-पाकिस्तान युध्दाचं खंर सत्य हे सगळ्या देशांपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर, पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे यामाध्यमातून विविध लोक, देशांपर्यंत प्रस्थापित होईल, असे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सांगितले. विरोधकांना सांगावं लागत आहे की, तुम्ही निवडू नका आम्हाला निवडू द्या, असे केंद्र सरकारला सांगावे लागत आहे, याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मला त्याची कल्पना नाही, असे सांगत बोलणे टाळले.

सात संसद सदस्य शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वपक्षीय शिष्टमंडळे भारताच्या राष्ट्रीय सहमती आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ दृष्टिकोन मांडतील. ते दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुतेचा देशाचा संदेश जगासमोर आणतील. विविध पक्षांचे संसद सदस्य, प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वे आणि प्रतिष्ठित राजनयिक प्रत्येक शिष्टमंडळाचा भाग असतील, असे भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Devendra Fadnavis)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.