भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला ‘सर्वपक्षीय’ बळ; पंतप्रधानांच्या ऐतिहासिक निर्णयाचे DCM Eknath Shinde यांच्याकडून स्वागत

50
भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला ‘सर्वपक्षीय’ बळ; पंतप्रधानांच्या ऐतिहासिक निर्णयाचे DCM Eknath Shinde यांच्याकडून स्वागत
  • प्रतिनिधी

दहशतवादाच्या मुळावर घाव घालण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेला निर्णायक निर्णय देशाच्या परराष्ट्र धोरणात ‘ऐतिहासिक टप्पा’ ठरणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या पुढील टप्प्यात सात सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध राष्ट्रांना पाठवण्याच्या निर्णयाचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

दहशतवादविरोधी लढ्यात भारताची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका ठाम

“दहशतवादाविरुद्ध भारताची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका अधिक प्रभावीपणे जगापुढे मांडण्यासाठी हे पाऊल अत्यंत निर्णायक आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधींना या मोहिमेत सहभागी करून देशाची एकजूट जगासमोर आणण्याचा उपक्रम अभिनंदनीय आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी म्हटले.

(हेही वाचा – ‘Tulbul Navigation Project’ पूर्ण करण्याची वेळ आलीय का?; जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पक्षांमध्ये खडाजंगी, वाचा संपूर्ण बातमी)

पाकिस्तानचा असली चेहरा जगासमोर

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी पहेलगाममधील निर्दयी दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत स्पष्ट केले की, “त्या अमानुष घटनेनंतर भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचा दहशतवादपुरस्कृत चेहरा जगासमोर उघड केला. हे कुठल्याही लष्करी विजयापेक्षा मोठे यश आहे.”

भारताची प्रतिमा ‘शांतताप्रिय, जबाबदार राष्ट्र’ म्हणून उजळणार

“दहशतवाद ही आज जगासमोरील सगळ्यात मोठी समस्या आहे. भारताने ज्या पद्धतीने सर्वपक्षीय एकजुटीने या लढ्यात झोकून दिले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा ‘शांतताप्रिय, जबाबदार व निर्णायक राष्ट्र’ म्हणून अधिक बळकट होईल,” असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) व्यक्त केला.

(हेही वाचा – Amarnath Yatra : जम्मू-काश्मीरमधील स्थानिक प्रशासन अॅक्शन मोडवर, मुख्यमंत्री म्हणाले, “आगामी Amarnath Yatra”)

दहशतवाद विरोधातील भारताचा निर्णायक टप्पा

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या मोहिमेमुळे भारताची दहशतवादविरोधी भूमिका केवळ तत्त्वतः नव्हे, तर कृतीतून जगभर सिद्ध होत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “हा निर्णय दहशतवादाला मूळापासून संपवण्यासाठी भारताच्या दीर्घकालीन धोरणांचा भाग आहे आणि त्यामुळे देशाच्या अस्मितेला जागतिक व्यासपीठावर नवसंजीवनी मिळेल.”

ठळक मुद्दे :
  • दहशतवादविरोधात भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’ भूमिकेला आंतरराष्ट्रीय बळ
  • सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांचा वेगवेगळ्या राष्ट्रांना दौरा
  • एकजुटीने दहशतवादाच्या विरोधात देशाची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत
  • पाकिस्तानच्या दहशतवादी चेहऱ्याला जागतिक व्यासपीठावर उघड करण्याचे प्रयत्न

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.