‘Operation Sindoor’वर भारताची भूमिका मांडणार ‘हे’ सात खासदार; विदेशात कोण-कोण शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात झीरो टॉलोरन्स धोरण अवलंबिले आहे. या माध्यमातून भारत सरकारने आता ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)वर भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना विदेशात पाठविणार आहे.

81

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात झीरो टॉलोरन्स धोरण अवलंबिले आहे. या माध्यमातून भारत सरकारने आता ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)वर भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना विदेशात पाठविणार आहे. येत्या २२ मे पासून ७ खासदारांना १० दिवसांसाठी ५ देशांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणार असून पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती तेथील सरकार आणि सामान्य लोकांना देतील.

(हेही वाचा ‘Operation Sindoor’नंतर पाकच्या पंतप्रधानांची कबुली; म्हणाले, ‘भारताच्या हल्ल्यात नूर खान एअरबेससह अनेक ठिकाणे झाली उद्ध्वस्त’ )

दरम्यान, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू खासदारांच्या परदेश दौऱ्याचे सूत्रसंचालन करत आहेत. शिष्टमंडळात सामील होण्यासाठी खासदारांना आमंत्रण पाठविण्यात आली असून पासपोर्ट आणि आवश्यक प्रवास कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सततच्या लढाईच्या संदर्भात सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे २२ मे पासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहेत.

खालील संसद सदस्य सात शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार आहेत : –

१) शशी थरूर, काँग्रेस

२) रविशंकर प्रसाद, भाजप

३) संजय कुमार झा, जेडीयू

४) बैजयंत पांडा, भाजप

५) कनिमोझी करुणानिधी, द्रमुक

६) श्रीमती सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी

७) श्रीकांत एकनाथ शिंदे, शिवसेना

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वपक्षीय शिष्टमंडळे भारताच्या राष्ट्रीय सहमती आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ दृष्टिकोन मांडतील. ते दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुतेचा देशाचा संदेश जगासमोर आणतील. विविध पक्षांचे संसद सदस्य, प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वे आणि प्रतिष्ठित राजनयिक प्रत्येक शिष्टमंडळाचा भाग असतील, असे भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Operation Sindoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.