आगामी अमरनाथ यात्रा(Amarnath Yatra) निर्विघ्न पार पडावी अशी आमची इच्छा आहे, असे मुख्यमंत्री अब्दुल्लाह म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनाला मोठा फटका बसला असून आता खुद्द मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह मैदानात उतरले आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून प्रशासन आता सुरक्षित आणि दुर्घटनामुक्त अमरनाथ यात्रा(Amarnath Yatra) सुनिश्चित करण्यात लक्ष केंद्रित करत आहोत, असेही मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांनी सांगितले.
(हेही वाचा Jammu and Kashmir : SIA ची काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी ; दहशतवादी हालचालींबद्दल मिळाली माहिती )
दरम्यान, राज्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला असून उन्हाळ्याच्या हंगामात आमच्याकडे फारसे पर्यटक येत नाहीत. आम्ही आता अमरनाथ यात्रे(Amarnath Yatra)वर लक्ष केंद्रित करत आहोत. अमरनाथ यात्रा कोणत्याही सुखरूप पार पडावी अशी आमची इच्छा आहे. अमरनाथ यात्रेसाठी येणारे भाविक त्यांच्या भेटीनंतर सुरक्षित आणि निरोगी परतावे अशी आमची इच्छा आहे, असे मुख्यमंत्री अब्दुल्लाह म्हणाले.
मुख्यमंत्री अब्दुल्लाह यांनी घेतली हॉटेलियर्स असोसिएशनसोबत बैठक
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी नागरी सचिवालयात हॉटेलियर्स असोसिएशनसोबत बैठक घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हॉटेलियर्सच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अब्दुल्लाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित असलेल्या विविध भागधारकांना आश्वासित करण्यात आले की, सरकार या क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा काळजीपूर्वक विचार करेल.(Amarnath Yatra)
Join Our WhatsApp Community