Haryana : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या हरियाणातील लोकप्रिय युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हिस्सारमधून अटक करण्यात आली आहे. गुप्तचर सूत्रांनुसार, ज्योतीवर पाकिस्तानी गुप्तचर एजंटना संवेदनशील माहिती दिल्याचा गंभीर आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये ज्योती मल्होत्राने कमिशनमार्फत पाकिस्तानचा व्हिसा मिळवला आणि ती पाकमध्ये गेली. या काळात तीचे पाकिस्तान उच्चायुक्तालय काम करणाऱ्या दानिश या कर्मचाऱ्याशी जवळचे संबंध निर्माण झाले. सूत्रांचे म्हणणे आहे की, येथूनच त्याचे पाकिस्तानी गुप्तचरांशी संपर्क सुरू झाला. (Haryana)
(हेही वाचा – मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि हार्बर रेल्वेच्या ‘या’ मार्गावर असणार Mega Block; जाणून घ्या वेळापत्रक)
गोपनीय माहिती केली शेअर
गुप्तचर संस्थांचा दावा आहे की, भारतात परतल्यानंतरही ज्योतीने पाकिस्तानी एजंटसोबत सतत संपर्क ठेवला आणि विविध माध्यमातून भारताशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर करत राहिली. या कृतीमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण होते. तसेच युट्यूबर पाकिस्तानहून परतल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी तिच्यावर पाळत ठेवली. तीचे ऑनलाइन व्यवहार, परदेश दौरे आणि संपर्कात असलेल्या काही लोकांची मागील अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती. पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर या यूट्यूबर महिला ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे.
सध्या ज्योती मल्होत्राची चौकशी केली जात आहे आणि तिच्या संपर्कात आणखी कोण होते हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राने गोपनीय माहिती पैशासाठी किंवा इतर कोणत्याही फायद्यासाठी शेअर केली का, याचाही तपास केला जात आहे. आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी एकूण ६ जणांना अटक केली आहे. यामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचाही समावेश आहे.
(हेही वाचा – Weather Update : ओडिशामध्ये वीज कोसळून 9 जणांचा मृत्यू ; पुढील ५ दिवस वादळ आणि पाऊस)