Mega Block : मध्य रेल्वे मुंबई विभागाद्वारे रविवार दिनांक १८ मे २०२५ रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक परीचालीत केला जाणार आहे. यामुळे मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (harbour line) मार्गावरील वाहतुकीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. (Mega Block)
(हेही वाचा – Bomb Threat: मुंबई विमानतळ आणि ताज महाल पॅलेसला बॉम्बने उडवण्याची दिली धमकी; ईमेलमध्ये अफजल गुरूचा उल्लेख)
ठाणे – कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०:४० ते दुपारी ०३:४० पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९:३४ ते दुपारी ३:०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/सेमी-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील, या सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०:२८ ते दुपारी ३:४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/सेमी-जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, या सेवा त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि नंतर मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस /दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस /दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवल्या जातील.
वडाळा रोड – मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:०० ते संध्याकाळी ०४:०० पर्यंत
या मेगाब्लॉक काळात वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सकाळी ०९:४० ते दुपारी ३:२८ पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल/बेलापूर/वाशीच्या दिशेने सकाळी १०:१४ ते दुपारी ३:५४ पर्यंत डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या ब्लॉक काळात पनवेल-मानखुर्द-पनवेल मार्गावर विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील.
हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी १०:०० ते संध्याकाळी ४:३० पर्यंत ट्रान्स हार्बर लाईन/मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. दरम्यान पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगाब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर असून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community