ओडिशामध्ये पावसाने थैमान घातले असून वीज कोसळून (Weather Update) 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यात ६ महिलांचा समावेश आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी देशातील २४ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील काही भागातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार आणि ओडिशामध्येही दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. (Weather Update)
हेही वाचा-Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत 29 बंगल्यांवर चालला बुलडोझर !
पुढील ४ दिवस म्हणजे २० मे पर्यंत मध्य प्रदेशात वादळ आणि पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज ३९ शहरांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी ग्वाल्हेर, खजुराहो आणि नौगाव येथे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. (Weather Update)
हेही वाचा- मराठा आरक्षण सुनावणी प्रकरणी High Court मध्ये विशेष पूर्णपीठ स्थापन !
मान्सून २७ मे च्या सुमारास केरळमध्ये दाखल होईल. शुक्रवारी सरकारने यासंदर्भात एक बैठक घेतली. यामध्ये मान्सूनच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांचे संपर्क क्रमांक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (Weather Update)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community