Bomb Threat: मुंबई विमानतळ आणि ताज महाल पॅलेसला बॉम्बने उडवण्याची दिली धमकी; ईमेलमध्ये अफजल गुरूचा उल्लेख

67
Bomb Threat: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अनोळखी ईमेलवरून विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा मेल येताच मुंबई पोलीस (Mumbai Police) यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Bomb Threat)

(हेही वाचा – Shiv Sena मध्ये मोठी घरवापसी! शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे अनेक नेते शिवसेनेत सामील; अमित घोडांचे पक्षात पुनरागमन)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. शनिवारी १७ मे ला सकाळी विमानतळ पोलीस ठाण्यात धमकीचा मेल आला. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरू आणि सॅवक्कू शंकर यांना अन्यायकारक रित्या फाशी दिल्याचा मेलमध्ये दावा करण्यात आला आहे.

(हेही वाचा – वानखेडे स्टेडियमवर Rohit Sharma च्या नावाच्या स्टँडचं भव्य अनावरण)

यापूर्वीही धमकीचा ईमेल
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या तीन दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याचा ईमेलही १३ मे रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाला होता. त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले असून, सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. आता विमानतळ पोलिसांनाही ईमेल मिळाला आहे. त्याच्या सत्यतेबाबत पोलीस तपास करत आहेत. धमकीचा मेल येताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. viduthalai_puli_vellum नावाचा ईमेल आयडीवरून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. ईमेल आयडीच्या वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धमकी देणाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५१(१) (३) (४) आणि ३५१ (१)  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.