Shiv Sena मध्ये मोठी घरवापसी! शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या अनेक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; अमित घोडांचे पक्षात पुनरागमन

194
Shiv Sena मध्ये मोठी घरवापसी! शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या अनेक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; अमित घोडांचे पक्षात पुनरागमन
  • प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी इनिंग घडवणारी घटना शुक्रवारी रात्री घडली. शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसेसह विविध संघटनांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shiv Sena) दाखल झाले. यामध्ये पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांची पक्षात घरवापसी झाल्याने ही भरती विशेष गाजली.

डहाणू, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, दादरा-नगर हवेली, धुळे, सोलापूरसह राज्यातील विविध भागांतील महत्त्वाचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा (Shiv Sena) झेंडा हाती घेतला.

(हेही वाचा – वानखेडे स्टेडियमवर Rohit Sharma च्या नावाच्या स्टँडचं भव्य अनावरण)

नेतृत्वाचा विश्वास, बाळासाहेबांचा वारसा पुढे

या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नव्या शिवसैनिकांना स्वागत करून स्पष्ट संदेश दिला –

“शिवसेना (Shiv Sena) ही संकटसमयी लोकांच्या पाठीशी उभी राहणारी संघटना आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.”

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक’ या संकल्पनेला चालना देत पक्ष विस्तारासाठी सर्वांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

(हेही वाचा – Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत 29 बंगल्यांवर चालला बुलडोझर !)

केंद्रस्थानी अमित घोडांची पुनरागमन

या सोहळ्यात पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) पुनरागमनाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. त्यांच्यासह काँग्रेसचे जितू पटेल, मनसेचे अनिकेत माच्छी, विविध गावांचे सरपंच, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, रामलीला प्रचार समितीचे सदस्य अशा अनेक दिग्गजांचा समावेश होता.

मुख्य उपस्थिती आणि ताकदीचे प्रदर्शन

कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव संजय मोरे, जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, तसेच विविध विभागांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “पक्षाची घडी मजबूत करताना आम्ही ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून ५ कोटी नागरिकांपर्यंत पोहोचलो. जनता शिवसेनेवर पुन्हा विश्वास ठेवते, याचे हे उदाहरण आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा – Neeraj Chopra चे ९० मीटर भालाफेकीचं स्वप्न पूर्ण, सुवर्ण मात्र हुकलं )

ठळक मुद्दे :
  • पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांची ‘घरवापसी’
  • काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे नेते-कार्यकर्ते शिवसेनेत
  • बाळासाहेब – दिघे साहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार
  • शिंदेंचा कार्यकर्त्यांना ‘गाव तिथे शिवसेना’ चा संदेश
  • विकासकामांवर जनतेचा विश्वास असल्याचे प्रतिपादन

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.