वानखेडे स्टेडियमवर Rohit Sharma च्या नावाच्या स्टँडचं भव्य अनावरण

75

ऋजुता लुकतुके

Rohit Sharma : भारतीय संघाचा एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधार रोहीत शर्माच्या नावाच्या स्टँडचं अनावरण मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये करण्यात आलं. गेल्या १८ वर्षांपासून रोहितने जागतिक क्रिकेटमध्ये भारताची प्रतिष्ठा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा रोहित हळूहळू त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. तेव्हा त्याला असा सन्मान मिळाला आहे. जो केवळ भारतातच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही काही मोजक्या खेळाडूंना मिळाला आहे. यापूर्वी फक्त विराट कोहली या एकमेव सक्रिय क्रिकेटपटूचा स्टँड भारतात उभा राहिला आहे. त्यानंतर रोहीत शर्मा हे असं दुसरं नाव आहे.  (Rohit Sharma)

मुंबई क्रिकेट असोसिएशनने ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमचा एक स्टँड हिटमॅनला समर्पित केला आहे. १६ मे, शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर एका विशेष कार्यक्रमात रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने काही दिवसांपूर्वी रोहीत शर्मासह माजी कसोटीपटू अजित वाडेकर आणि एमसीए व आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाच्या स्टँडची धोषणा केली होती.

शुक्रवारी, वानखेडे स्टेडियमवर एका विशेष कार्यक्रमात, एमसीएने रोहितच्या नावावर असलेल्या स्टँडचे उद्घाटन केले. यावेळी रोहितची पत्नी आणि पालकही त्याच्यासोबत उपस्थित होते. दरम्यान रितिका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. वानखेडेवरील स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्यात आल्यानंतर रितिकाला अश्रू अनावर झाले आणि हा गोड क्षण कॅमऱ्यात कैद झाला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), माजी एमसीए अध्यक्ष शरद पवार, एमसीएचे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि इतर अनेक अधिकारी आणि चाहते उपस्थित होते. विशेष म्हणजे स्टँडवरील पडदा उघडण्याचे बटण रोहितने स्वतः दाबले नाही तर हे शुभ कार्य त्याच्या पालकांच्या हातांनी पूर्ण केले.

(हेही वाचा – Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत 29 बंगल्यांवर चालला बुलडोझर !)

भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “मी दोन फॉरमॅटमधून निवृत्त झालो आहे, पण मी अजूनही एकाच फॉरमॅटमध्ये खेळत आहे. त्यामुळे खेळताना असा सन्मान मिळणे हे खूप खास आहे. आता 21 तारखेला जेव्हा मी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून खेळेन, तेव्हा माझे नाव स्टँडवर पाहणे खूप खास असेल.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.