Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत 29 बंगल्यांवर चालला बुलडोझर !

Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत 29 बंगल्यांवर चालला बुलडोझर !

107
Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत 29 बंगल्यांवर चालला बुलडोझर !
Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत 29 बंगल्यांवर चालला बुलडोझर !

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकादेशीर बंगले आणि इतर बांधकामांवर जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु आहे. रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळला आहे, त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत, 31 मे पूर्वी ही नदीपात्रातील बांधकामे पाडून नदीचे मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. आज या बंगल्यांच्या तोडकामाला महानगरपालिकेने प्रारंभ केला. (Pimpri Chinchwad)

हेही वाचा-IMF ने पाकिस्तानला दिलेल्या मदतीचा पुन्हा विचार करावा ; Rajnath Singh यांचे निर्देश

पालिकेच्या पथकांनी अनेक बुलडोझर आणून एकाचवेळी 29 बंगल्यांच्या तोडकामाला प्रारंभ केला. या तोडकामामुळे चिखली परिसरात उद्ध्वस्त झालेले बंगले दिसत आहेत. रिव्हर व्हीला प्रोजेक्ट मध्ये एकूण 36 बंगले आहेत. पैकी 29 रहिवाशी न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने मात्र बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले, त्यामुळं आता या प्रोजेक्ट मधील 36 ही बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु आहे. (Pimpri Chinchwad)

हेही वाचा- World Hypertension Day : प्रत्येक मुंबईकर दर दिवशी खातात ९ ग्रॅम पेक्षा जास्त मीठ, ‘हा’ आजार उद्भवू शकतो

इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत मधील 29 बंगल्यावर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली आहे. पहाटे पासून बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली आहे. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जात आहेत. (Pimpri Chinchwad)

हेही वाचा- ISIS Pune Module प्रकरणातील दोन संशयितांना मुंबई विमनातळावर अटक ; दोघांवर होते ३ लाखांचे बक्षीस

चिखलीतील सर्व्हे नंबर 90 मध्ये बंगलो प्लॉट बांधकाम प्रकल्प करण्यात आला होता. महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेच्या प्रतिबंधित क्षेत्रात ही बांधकामे करण्यात येत होती. या बांधकामामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आणून पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा कायद्यांचे उल्लंघन केले जात होते. संबंधित विकासकांनी पर्यावरण अधिनियमातील तरतुदींचं उल्लंघन झाले होते. सध्या चिखली परिसरात हे 29 बंगले पाडण्यासाठी कारवाई सुरु आहे. (Pimpri Chinchwad)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.