पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान त्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले तर यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. (Operation Sindoor)
हेही वाचा-CAIT Trade Council : तुर्की आणि अझरबैजानसोबतच्या व्यापारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
या सर्व पार्श्वभूमीवर आता ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार सर्व पक्षांच्या खासदारांना परदेशात पाठवणार आहे. २२ मे पासून ५-६ खासदारांचे ८ गट १० दिवसांसाठी ५ देशांना भेट देतील. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती तेथील सरकार आणि सामान्य लोकांना देतील. या प्रत्येक गटामध्ये सर्व पक्षीय खासदारांचा समावेश असणार आहे. या संदर्भात संसदीय कामकाज मंत्रालयाची राजकीय पक्षांशी चर्चा सुरू आहे. हे खासदार परदेशात जाऊन ऑपरेश सिंदूरबाबतची भारताची भूमिका मांडणार आहेत. (Operation Sindoor)
हेही वाचा- Lead Turns Gold : शास्त्रज्ञांनी शिशाचं रुपांतर काही क्षणांसाठी सोन्यात केलं तेव्हा…
खासदारांसोबत परराष्ट्र मंत्रालयाचा (MEA) एक अधिकारी आणि एक सरकारी प्रतिनिधी देखील असतील. हे शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार आणि युएई येथे जातील आणि तेथे पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावावर आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करतील. (Operation Sindoor)
हेही वाचा- Dnyanpith Award : ५८वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू खासदारांच्या परदेश दौऱ्यांचे सूत्रसंचालन करत आहेत. शिष्टमंडळात सामील होण्यासाठी खासदारांना आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. खासदारांना त्यांचे पासपोर्ट आणि आवश्यक प्रवास कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. (Operation Sindoor)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community