विशेष प्रतिनिधी
Sanitary waste : मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या घरगुती सॅनिटरी कचरा व विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेमध्ये, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील दुय्यम अभियंता स्वप्नील पाटील यांनी ते राहत असलेल्या इमारतीतील सर्व सदनिकांची नोंदणी करुन घेतली तसेच सॅनिटरी कचरा संकलनाला चालना दिली आहे. पाटील यांनी स्वतःच्या कृतीतून इतरांसमोर चांगले उदाहरण ठेवले आहे. याबद्दल प्रशासनातील वरिष्ठांकडून त्यांचे कौतुक केले आहे. (Sanitary waste)
(हेही वाचा – APMC Market : राज्याच्या बाजार समित्या ‘सुपर पॉवर’ होणार?)
नोंदणी झाल्याप्रमाणे, १४ मे २०२५ रोजी जी / दक्षिण विभाग कार्यालयाद्वारे महानगरपालिका वसाहतीत घरगुती सॅनिटरी कचरा गोळा करण्यासाठी पिवळ्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या वसाहतीत घरगुती सॅनिटरी कचरा गोळा करण्याच्या दृष्टिने, जी दक्षिण विभाग कार्यालय अंतर्गत मालमता खात्यातील कुशल कामगार सुभाष बागुल यांना १५ मे २०२५ रोजी प्रशिक्षित करण्यात आले. त्याप्रमाणे बागूल यांनी प्रत्येक घरात जावून, जनजागृती करून स्वतंत्रपणे सॅनिटरी कचरा संकलित केला. या कचरा संकलनामध्ये सुरक्षा रक्षक राहुल सिंग यांनीही मदत केली.
(हेही वाचा – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सल्ल्याला ‘Apple’कडून केराची टोपली; विरोध झुगारून भारताला दिले ‘हे’ आश्वासन)
हा सर्व संकलित कचरा सुमारे साडेतीन किलो वजनाचा होता. हा घरगुती सॅनिटरी कचरा वेगळा करुन त्याचे योग्य संकलन होण्यासाठी रॉयल गार्डन या इमारतीमधील या सर्व रहिवाशांनी उत्तम सहकार्य केले. पाटील यांच्याप्रमाणेच महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी आपल्या इमारतींमध्ये तथा वसाहतींमध्ये प्रयत्न केल्यास ओला व सुका कचरा वर्गीकरण व संकलन, सॅनिटरी कचरा व इ-कचरा संकलन या सर्वांबाबत नागरिकांसमोर चांगले उदाहरण मांडता येईल. त्यातून नागरिकांनीही तशी कृती करावी, यासाठी प्रोत्साहित करता येईल. अशी अपेक्षा महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
हेही पहा –