Nirav Modi Bail Rejected पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरार मुख्य आरोपी नीरव मोदी (Nirav Modi) ला लंडन न्यायालयाने झटका दिला आहे. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी दाखल केलेली नवीन जामीन अर्ज गुरुवारी लंडनच्या किंग्ज बेंच डिव्हिजनच्या उच्च न्यायालयाने (London King’s Bench Division High Court) फेटाळली. न्यायालयात सीबीआयच्या जोरदार युक्तिवादामुळे कोर्टाने जामीन नाकारला. यूकेमध्ये अटकेनंतरची त्याची ही दहावी जामीन याचिका आहे. (Nirav Modi Bail Rejected)
(हेही वाचा – कावळे, गिधाडे आणि बगळे; कचरा कंत्राटवरून BJP Mumbai अध्यक्षांचा रोख कोणावर?)
या प्रकरणात, क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) च्या वकिलाने जामिनाला जोरदार विरोध केला, मात्र सीबीआय टीमने क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (CPS) सोबत संपूर्ण प्रकरणात भारत सरकारची बाजू जोरदारपणे मांडली. यासाठी सीबीआय तपास पथक लंडनला पोहोचले होते. नीरव मोदीला जामीन देणे न्यायालयीन प्रक्रियेसाठी हानिकारक ठरू शकते. हे सिद्ध करण्यासाठी सीबीआयने जोरदार युक्तिवाद सादर केले. परिणामी, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.
(हेही वाचा – पेडणेकरवाडीच्या तप्त माळरानावर Solar Energy ची हिरवी उमेद; पाण्याचा झरा अखेर सुरू!)
दहावा जामीन अर्ज फेटाळला
यूकेमध्ये अटकेनंतर हा त्यांचा १० वा जामीन अर्ज होता, ज्याचा सीबीआयने क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसद्वारे यशस्वीरित्या बचाव केला, असे एजन्सीने म्हटले आहे. पीएनबी घोटाळ्यातील सह-आरोपी नीरव मोदीचा काका मेहुल चोक्सी याला १२ एप्रिलला बेल्जियममधील एका रुग्णालयातून अटक करण्यात आली. आता त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
(हेही वाचा – APMC Market : राज्याच्या बाजार समित्या ‘सुपर पॉवर’ होणार?)
२०१९ पासून लंडनच्या तुरुंगात
नीरव दीपक मोदी हा १९ मार्च २०१९ पासून ब्रिटीश तुरुंगात आहे. ६४९८.२० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी सीबीआय त्याला भारतात हवा आहे. त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे.
हेही पहा –