रायगड जिल्ह्यात Muslim दाम्पत्याचा कारनामा; मांत्रिकाच्या सांगण्यावरून सार्वजनिक विहिरीत टाकले मंतरलेले साहित्य

61
रायगड जिल्ह्यात Muslim दाम्पत्याचा कारनामा; मांत्रिकाच्या सांगण्यावरून सार्वजनिक विहिरीत टाकले मंतरलेले साहित्य
  • प्रतिनिधी 

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढता तणाव असतानाच सार्वजनिक विहिरीत संशयास्पद वस्तू टाकत असताना गावकऱ्यांनी एका मुस्लिम (Muslim) दाम्पत्याला रंगेहात पकडल्यामुळे रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. विहिरीत कथित विषारी द्रव्य टाकण्यात आल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दाम्पत्याच्या चौकशीत मात्र काळ्या जादूचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जोडप्याने मुलीला प्रेमसंबंधातून दूर करण्यासाठी एका मांत्रिकांच्या सांगण्यावरून मंतरलेल्या ताईत, बांधलेल्या विटा आणि राख विहिरीत विसर्जित करण्यासाठी आलो होतो अशी कबुली या दाम्पत्यानी पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकाराची खात्री केल्यानंतर मुस्लिम (Muslim) दाम्पत्यासह मांत्रिकाविरुद्ध अंधश्रद्धा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून या दाम्पत्याना अटक केली आहे. मांत्रिकाचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे मात्र रायगड जिल्ह्यातील गावामध्ये चर्चेला उधाण आले होते आणि गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

(हेही वाचा – UPSC President : संरक्षण मंत्रालयाचे सचिव राहिलेले Dr. Ajay Kumar यांच्याकडे UPSC अध्यक्षपदाची सुत्रे)

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिसांनी अटक केलेले मुस्लिम (Muslim) जोडपे हे नवी मुंबईतील नेरुळ परिसरात राहणारे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर २३ येथील राहणारे मुस्लिम (Muslim) दाम्पत्याने त्यांच्या मुलीला तिच्या प्रियकरापासून दूर करण्यासाठी तसेच तिचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी एका मुस्लिम मांत्रिकाची मदत घेतली होती. मांत्रिकाने काही तांत्रिक विधी केल्या आणि त्यांना ताईत, गुंडाळलेल्या पाच विटा, विभूती (पवित्र राख) आणि इतर संशयास्पद वस्तू देऊन त्या वस्तू विहिरीत विसर्जित करण्यास सांगितले.

(हेही वाचा – Indian Army Eastern Command : मणिपूरमधील चांदेल येथे आसाम रायफल्सने केलेल्या कारवाईत १० बंडखोर ठार)

त्यानंतर या मुस्लिम (Muslim) दाम्पत्याने नेरुळहून रेवदंडा असा प्रवास केला आणि तालुक्यातील मुरुड येथील सालब पुलापासून ताडवाडीपर्यंतच्या मार्गावर त्यांनी विटा विविध सार्वजनिक विहिरींमध्ये विसर्जित करीत असताना, काही गावकऱ्यांनी त्यांना बघितले आणि विहिरीतले पाणी दूषित झाले म्हणून ग्रामस्थांमध्ये भीती पसरली. स्थानिकांनी संशयास्पद हालचाली वरून या दाम्पत्याना ताब्यात घेऊन पोलिसांना कळवले. रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या दाम्पत्याना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी मुस्लिम (Muslim) जोडप्याने सांगितलेल्या प्रकाराची खात्री केल्यानंतर मुस्लिम (Muslim) दाम्पत्यासह मांत्रिकाविरुद्ध अंधश्रद्धा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून या जोडप्याला अटक केली आहे. मांत्रिकाचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.