Indian Army Eastern Command : मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या तुकडीसोबत झालेल्या चकमकीत दहा बंडखोर ठार झाल्याची माहिती Indian Army Eastern Commandने ‘एक्स’वर पोस्ट करत दिली. दरम्यान, पूर्व कमांडने दिलेल्या माहितीनुसार, भारत-म्यानमार सीमेजवळील चांदेल जिल्ह्यातील खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ सशस्त्र दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल विशिष्ट गुप्त माहितीवरून मोठी कारवाई केली.
(हेही वाचा आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरच होईल; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा पुनरुच्चार )
दरम्यान, स्पीअर कॉर्प्सच्या अंतर्गत आसाम रायफल्स युनिटने दि. १४ मे २०२५ रोजी एक ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर आता संशयित बंडखोरांचा खात्मा करण्यात आला आहे. Indian Army Eastern Commandने अतिशय संयमित व मोजमापाने दिलेल्या प्रत्युत्तरात १० बंडखोरांना ठार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडने ट्विटमध्ये काय म्हटलं
इंडो म्यानमार सीमेजवळील चांदेल जिल्ह्यातील खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ सशस्त्र कार्यकर्त्यांच्या हालचालींबद्दल गुप्त माहितीवरून कारवाई करत स्पीअरकॉर्प्स अंतर्गत आसाम रायफल्स युनिटने १४ मे २०२५ रोजी एक ऑपरेशन सुरू केले. ऑपरेशन दरम्यान, संशयित कार्यकर्त्यांनी सैन्यावर गोळीबार केला असता प्रतिहल्ला करण्यात आला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात १० बंडखोरांना ठार करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला.Indian Army Eastern Command
Join Our WhatsApp Community