केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे माजी सचिव Dr. Ajay Kumar यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगा(UPSC)च्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. आयोगाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य निवृत्त लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी अजय कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
डॉ. अजय कुमार यांचा आजवरचा प्रवास
डॉ. अजय कुमार भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी या विषयात बी.टेक. ही पदवी मिळवल्यानंतर अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातून अप्लाईड इकॉनॉमिक्स या विषयात एम.एस. केले. तसेच, डॉ. अजय कुमार यांनी मिनेसोटा विद्यापीठातील कार्लसन स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून व्यवसाय व्यवस्थापन विषयात डॉक्टरेट मिळवली आहे.
डॉ.अजय कुमार हे भारतीय प्रशासकीय सेवे(आयएएस)च्या १९८५ च्या तुकडीतील केरळ कॅडरचे विद्यार्थी आहेत. सुमारे ३५ वर्षांच्या वैभवशाली कारकिर्दीत त्यांनी केरळ राज्य सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये देखील बऱ्याच महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी राज्य स्तरीय पातळीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सचिव यांसारख्या पदांची महत्वपूर्ण जबाबदारी निभावली आहे.
केंद्र सरकारमध्ये डॉ.अजय कुमार यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग संचालक, दूरसंवाद तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव, राष्ट्रीय माहितीविज्ञान केंद्राचे महासंचालक, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांचे काम सांभाळले. सर्वात अलीकडच्या काळात ते संरक्षण मंत्रालय सचिव म्हणून कार्यरत राहिले.
Join Our WhatsApp Community