Jawan : चिमुकली जेव्हा जवानाच्या पाया पडते; भावूक करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

229
सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका चिमुकली सर्वांचे मन जिंकले आहे. यामध्ये एक चिमुकली धावत धावत जवळ उभे असलेल्या जवानांकडे (Jawan) जाते, त्यांच्याकडे मान वरून पाहते, जवानही प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतो, तेव्हा चिमुकली हळूच खाली वाकते आणि जवानाच्या पायाला हात लावून डोक्याला लावते. चिमुकलीची ही कृती पाहून भावूक झालेल्या जवानाचे पाय किंचित मागे सरकतात. त्यावेळी जवान (Jawan) त्या चिमुकलीचे प्रेमाने गालगुच्चा घेतो. काही सेंकंदाचा हा व्हिडीओ जवानांप्रती जितका कृतज्ञता भाव निर्माण करतो तितकाच त्या चिमुकलीच्या प्रति वात्सल्य भाव निर्माण करत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामागे भारताचे शूर सैनिक आहेत. त्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमातून पाकिस्तानला धडा शिकवला आहे आणि पाकिस्तानचा पराभव झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे डोळे पाणावतील. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की काही लष्करी जवान (Jawan) मेट्रो स्टेशनजवळ उभे आहेत, तेव्हा एक लहान मुलगी येऊन एका लष्करी जवानाच्या पायाला स्पर्श करते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीने सर्वांचे मन जिंकले आहे. आपल्याकडे सैन्य आहे म्हणून  आपण सुरक्षित आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे सैनिक सीमेवर उभे आहेत, त्यामुळे आपले सर्व कुटुंब सुरक्षित आहे. असे असूनही, काही लोक या शूर सैनिकांना अभिवादन करण्यास कचरतात. ही मुलगी अशा लोकांसाठी एक उदाहरण आहे. इतक्या लहान वयात आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे धाडस समजून घेणे नव्हे तर त्यांचा आदर करणे ही खरोखरच एक मोठी गोष्ट आहे.

व्हिडिओ व्हायरल झाला

हा व्हिडिओ १५ जुलै २०२२ चा असला तरी तो आजही व्हायरल होत आहे. रवी रंजन नावाच्या एका नेटकऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जर कोणी विचारले की संस्कार (संस्कृती) म्हणजे काय, तर त्याला हा व्हिडिओ दाखवा.’ (Jawan)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.