Jammu & Kashmir च्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक! ३ दहशतवादी ठार

42
Jammu & Kashmir च्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक! ३ दहशतवादी ठार

Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी १५ मे ला पहाटे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार झालेत. त्राल भागातील नादिर गावात झालेल्या चकमकीत आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वणी आणि यावर अहमद भट हे 3 दहशतवादी ठार झालेत. (Jammu & Kashmir)

(हेही वाचा – मध्य प्रदेशमध्ये Love Jihad चे आणखी एक प्रकरण उघडकीस; मुस्लिम तरुणाने हिंदू असल्याचे सांगून केले नको ते ‘कृत्य’)

दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी १५ मेला पहाटे भारतीय सैन्य, जम्मू- काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांनी संयुक्तरित्या नादर, त्राल, अवंतीपोरा येथे घेराबंदी आणि शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान सतर्क जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला आणि त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युतर दिले.

जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार
सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांच्या सोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार झालेत. याठिकाणी अद्याप चकमक सुरु असल्याची माहिती भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये 48 तासांतील ही दुसरी चकमक आहे. शोपियांन जिल्ह्यातील केलर भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी त्राल येथे ही चकमक घडली होती.

(हेही वाचा – Pakistan जिथे उभा राहतो तिथून भिकाऱ्यांची रांग सुरु होते; संरक्षणमंत्री Rajnath Singh यांची जोरदार टीका)

दरम्यान यापूर्वी लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवाद्यांना दक्षिण काश्मीरच्या शोपियांना येथे मंगळवारी ठार करण्यात आले होते. या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित तीन दहशतवाद्यांपैकी दोन जणांची ओळख पटल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात केलरच्या शुक्रू भागातील जंगलात हे तीन दहशतवादी ठार झाले होते. ठार झालेल्या पैकी एक दहशतवादी हा शोपीयांन येथील छोटीपोर हीरापोरा येथील रहिवासी आणि मोहम्मद युसूफ कुट्टे याचा मुलगा शाहिद कुट्टे होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.