मुंबई जागोजागो बेकरी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. त्यामध्ये विशेष करून पावाची (Bread) विक्री खूप अधिक होत असते. परंतु हे पाव जास्तीत जास्त ५ दिवस सुस्थितीत राहू शकतात. त्यामुळे साहजिकच खराब झालेले पावही (Bread) तितक्याच संख्येने असतात. मात्र हे खराब झालेले पाव पुन्हा निराळ्या पद्धतीने हॉटेलमध्ये ग्राहकांच्या ताटात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचा भांडाफोड करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
*मुंबई में सड़कर रखें हूए पांव से चटनी बनाने के लिए पांव से पावडर बनाने के बाद आपके के उपयोग केसे हो रहा है 👀🙆♂️* @mybmc pic.twitter.com/wJeFpIgbnT
— vinod kisan shinde (@vinodkshinde) May 14, 2025
मुंबईत एका ठिकाणी शहर आणि उपनगर येथे खराब झालेले पाव (Bread) हजारोंच्या संख्येने जमा केले जातात. हे पाव बेकरीमध्येही १५-२० दिवस पडलेले असतात. जे कचऱ्यात फेकण्याच्या लायक असतात, त्या पावांना किडे पडलेले असतात, ते सडलेले असतात. असे पाव (Bread) एकत्र करून त्यांची पावडर बनवून ती एक-एक किलोचे पाकीट बनवून हॉटेलमध्ये विकले जात आहेत. त्या हॉटेलांमध्ये या पावडरने ग्रेव्ही आणि चटणी बनवली जाते. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
Join Our WhatsApp Community