जम्मू आणि काश्मीरच्या अवंतीपोरा भागातील नादेर, त्राल येथे पोलीस दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरूवारी चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. काश्मीर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर यासंबंधीची माहिती दिली आहे. पोलीस आणि Pahalgam Terror Attackध्या चकमक सुरू असून घडामोडींची माहिती दिली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. (Jammu and Kashmir)
#Encounter has started at Nader, Tral area of #Awantipora. Police and security forces are on the job. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) May 15, 2025
दरम्यान यापूर्वी लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवाद्यांना दक्षिण काश्मीरच्या शोपियांना येथे मंगळवारी ठार करण्यात आले होते. या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित तीन दहशतवाद्यांपैकी दोन जणांची ओळख पटल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात केलरच्या शुक्रू भागातील जंगलात हे तीन दहशतवादी ठार झाले होते. ठार झालेल्या पैकी एक दहशतवादी हा शोपीयांन येथील छोटीपोर हीरापोरा येथील रहिवासी आणि मोहम्मद युसूफ कुट्टे याचा मुलगा शाहिद कुट्टे होता.
(हेही वाचा – धरणातील गाळ काढण्यासाठी नवे धोरण आखा; Radhakrishna Vikhe Patil यांचे निर्देश)