ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू Neeraj Chopra यांना लेफ्टनंट कर्नलपदावर बढती

भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू Neeraj Chopra याला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले आहे. याआधी सैन्यात नायब सुभेदार पदावर असणाऱ्या नीरज चोप्राला बढती मिळाली असून लेफ्टनंट कर्नल पदावर सैन्यात कार्यरत असेल. दरम्यान, भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.

43

भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू Neeraj Chopra यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले आहे. याआधी सैन्यात नायब सुभेदार पदावर असणाऱ्या नीरज चोप्राला बढती मिळाली असून लेफ्टनंट कर्नल पदावर सैन्यात कार्यरत असेल. दरम्यान, भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.

(हेही वाचा Make in India : शत्रूंच्या ड्रोन स्वार्मला भारताचं ‘भार्गवस्त्र’ पुरून उरणार, काउंटर-ड्रोन सिस्टिमची यशस्वी चाचणी )

दि. ०९ मे रोजीच्या भारतीय राजपत्रानुसार, हे आदेश दि. १६ एप्रिल २०२५ पासून लागू झाले आहेत, असे लष्करी व्यवहार विभागातील संयुक्त सचिवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे, दि. २६ ऑगस्ट २०१६ रोजी ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नोंदणी झाल्यानंतर नीरज यांनी भारतीय सैन्यात नायब सुभेदार पद स्वीकारले होते.

भालाफेकपटू नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल म्हणून वेतन: भारतासाठी ऑलिंपिकमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकणारे नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले आहे. नीरज चोप्रा हे यापूर्वी भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर होते. लेफ्टनंट कर्नल झाल्यानंतर नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात बढती मिळाली आहे. यासोबतच त्याचे मानधनही वाढणार आहे.Neeraj Chopra

लेफ्टनंट कर्नल झाल्यानंतर किती पगार मिळेल?

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांना लेफ्टनंट कर्नलनंतर भारतीय सैन्याकडून चांगला पगार मिळेल. भारतीय संरक्षण अकादमीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलला १,२१,२०० ते २,१२,४०० रुपये पगार मिळतो.Neeraj Chopra

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.