Semiconductor Unit : उत्तर प्रदेशात सेमीकंडक्टर युनिटला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Semiconductor Unit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने (Semiconductor Unit)इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एका सेमीकंडक्टर युनिटच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे.

44

Semiconductor Unit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने (Semiconductor Unit)इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एका सेमीकंडक्टर युनिटच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या सेमीकंडक्टर युनिटला उत्तर प्रदेशात स्थापित करण्यात येणार आहे. केंद्राच्या सेमी कंडक्टर मिशन अंतर्गत याआधीच पाच सेमीकंडक्टर युनिट बांधकामाच्या प्रगत टप्प्यात आहेत.

(हेही वाचा Operation Sindoor : किराना हिल्सबाबत तर्कवितर्कांना उधाण; चौकशीसाठी पथक…?, अमेरिकन प्रवक्ते म्हणाले… )

त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या सहाव्या सेमीकंडक्टर युनिटला उत्तर प्रदेशात प्रस्थापित करण्यात येणार असून या सहाव्या युनिटसह भारत धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सेमीकंडक्टर उद्योग विकसित करण्याच्या प्रवासात पुढे जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले Semiconductor Unit एचसीएल आणि फॉक्सकॉनचा संयुक्त उपक्रम असणार आहे. देशभरात सेमीकंडक्टर उद्योग आता आकार घेत असून देशभरातील अनेक राज्यांमध्ये जागतिक दर्जाच्या डिझाइन सुविधा उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारे डिझाइन फर्म्सचा जोरदार पाठपुरावा करत आहेत.

एचसीएलचा हार्डवेअर विकसित करण्याचा आणि उत्पादन करण्याचा दीर्घ इतिहास आहे. फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक स्तरावरील प्रमुख कंपनी आहे. ते एकत्रितपणे यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण किंवा येईडा येथे जेवर विमानतळाजवळ एक प्लांट स्थापित करतील. हा प्लांट मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स, पीसी आणि डिस्प्ले असलेल्या असंख्य इतर उपकरणांसाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार करेल. त्याचबरोबर, प्लांट दरमहा २०,००० वेफर्ससाठी डिझाइन केलेला असून डिझाइन आउटपुट क्षमता दरमहा ३६ दशलक्ष युनिट्स आहे.Semiconductor Unit

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.