Operation Keller : ‘शोधा आणि नष्ट करा’, दहशतवाद्यांकरिता भारतीय लष्कर ठरणार कर्दनकाळ

Operation Keller : ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारतीय लष्कराकडून 'Operation Keller' सुरू केले आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताने आपली मोहीम तीव्र केली असून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना शोधून ठार करण्याचे ठरविले आहे.

44

Operation Keller : ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारतीय लष्कराकडून ‘Operation Keller’ सुरू केले आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताने आपली मोहीम तीव्र केली असून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना शोधून ठार करण्याचे ठरविले आहे. दरम्यान, ऑपरेशन किलर अंतर्गत काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे नवीन कारवाई सुरू केली असून शोपियान जिल्ह्यातील शोकल केलर भागात झालेल्या जोरदार गोळीबारात ०३ दहशतवाद्यांना ठार मारले आहे.

(हेही वाचा Make in India : शत्रूंच्या ड्रोन स्वार्मला भारताचं ‘भार्गवस्त्र’ पुरून उरणार, काउंटर-ड्रोन सिस्टिमची यशस्वी चाचणी )

मिळालेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून दारूगोळा आणि गनपावडर जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एके-४६, सुमारे २०० एके राउंड, अनेक मॅगझिन, ३ ग्रेनेड आणि काही रोख रक्कम होती. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. शाहिद अहमद कुट्टे, अदनान शफी दार आणि अहसान अहमद शेख अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.

ऑपरेशन केलर ही भारतीय सैन्याची एक विशेष कारवाई आहे जी जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान भागात राबवण्यात आली. हे ऑपरेशन दि. १३ मे २०२५ रोजी सुरुवात करण्यात आले असून दहशतवादाविरुद्ध झीरो टोलोरंस धोरणांतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईचा थेट अर्थ दहशतवाद्यांना शोधून मारणे असा आहे.

दहशतवाद्यांना संपवण्याचे ध्येय ‘ऑपरेशन केलर’

ऑपरेशन केलर ही भारतीय सैन्याची एक विशेष कारवाई आहे जी जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान भागात राबवण्यात आली. दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता धोरणांतर्गत ही मोहीम १३ मे २०२५ रोजी सुरू करण्यात आली आहे. या ऑपरेशनचा थेट अर्थ दहशतवाद्यांना शोधून मारणे म्हणजेच ‘शोधा आणि नष्ट करा’ असा आहे.Operation Keller

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.