-
ऋजुता लुकतुके
अँडी मरे आणि नोवाक जोकोविच यांनी आपली सहा महिन्यांची भागिदारी मोडत असल्याचं जाहीर केलं आहे. मरे गेले काही महिने जोकोविचच्या प्रशिक्षकांच्या ताफ्यात होता. नोव्हेंबरमध्ये जोकोविचने अँडी मरेबरोबर प्रशिक्षक पदासाठी करार केला तेव्हात अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. कारण, मरे आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक टेनिसमधून नुकताच निवृत्त झाला होता. आणि प्रशिक्षणाचा कुठलाही अनुभव नसताना जोकोविचने त्याच्याशी करार केला होता. (Novak Djokovic)
२०२५ ची सुरुवात जोकोविचसाठी चांगली झालेली नाही आणि पहिल्या दोन्ही स्पर्धांमध्ये तो पहिल्या फेरीतच पराभूत झाला. ३७ वर्षीय चॅम्पियन सध्या मात्र फॉर्मसाठी झगडत आहे आणि त्यातूनच त्याने मरेला हटवण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. जोकोविचच्या खात्यात सध्या २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत आणि तो विक्रमी २५ व्या विजेतेपदासाठी प्रयत्न करतोय. (Novak Djokovic)
(हेही वाचा – Sanatan : जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सनातन मूल्यपरंपरा ठरणार दिशादर्शक )
View this post on Instagram
‘मला सोबत काम करण्याची संधी दिली त्यासाठी मी नोवाकचे आभार मानतो. त्याच्या इतर प्रशिक्षकांचाही मी आभारी आहे. मागच्या सहा महिन्यांत आम्ही एकत्र खूप मेहनत घेतली. आता नोवाकच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा,’ असा संदेश अँडी मरेनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिला आहे. दोघं एकत्र आल्यानंतर ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत नोवाकने कार्लोस अल्काराझचा पराभव केला. पण, नंतर उपांत्य फेरीत त्याला झ्वेरेव विरुद्घचा सामना दुखापतीमुळे सोडावा लागला. तिथून पुढील स्पर्धांमध्ये सगळं बिघडत गेलं. (Novak Djokovic)
(हेही वाचा – Mumbai Metro 9 : काशीगाव-दहिसर मेट्रो मार्गिकेवर तांत्रिक तपासणी, मुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले…)
View this post on Instagram
‘प्रशिक्षक अँडी मरेचे खूप खूप आभार. तू माझ्यावर खूप मेहनत घेतलीस आणि मैदानावर तसंच बाहेरही मला कायम पाठिंबा दिलास. हे सहा महिने खूप चांगले होते,’ असं नोवाकने आपल्या संदेशात म्हटलं आहे. अँडी मरे एकेकाळी कोर्टवर जोकोविचचा प्रतिस्पर्धी होता. २०१२ चं अमेरिकन ओपन विजेतेपद आणि २०१३ चं विम्बल्डन विजेतेपद यांत त्याने जोकोविचचाच अंतिम फेरीत पराभव केला होता. त्यानंतर काही काळ दोघं एकत्र दुहेरीतही खेळले होते. मैदानाबाहेर दोघं चांगले मित्र आहेत. (Novak Djokovic)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community