Operation Sindoor : रिझवान कुरेशीची फेसबुक पोस्ट अन् जमावाकडून बेदम मारहाण, पश्चिम बंगालमधील नेमकं प्रकरण काय?

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरद्वारे झालेल्या भारतीय सैन्यदलाच्या कारवाईचे देशभरातून स्वागत होत असताना पश्चिम बंगालमध्ये एक घटना घडली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान दि. १२ मे रोजी पाकिस्तान समर्थक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल स्थानिकांनी मांस विक्रेत्या रिझवान कुरेशीला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. परगणा जिल्ह्यातील बारासत शहरात ही घटना घडली.

118

(हेही वाचा भारतासमोर पाकिस्तान नरमला; चुकून पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेल्या BSF जवानाला मुकाटपणे भारताच्या स्वाधीन केले )

दरम्यान, स्थानिकांच्या एका जमावाने मांस विक्रेत्या रिझवान कुरेशीला बेदम मारहाण केली. रिझवानने पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली. त्यानंतर ऑनलाईन समोर आलेल्या व्हिडिओतून पाकिस्तानच्या समर्थनार्थ आशय पाहून स्थानिकांनी दुकानाची तोडफोड केली.

महत्त्वाचे म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानविरुद्ध सरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) दरम्यान ही घटना घडली. स्थानिक व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, रिझवानने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ व्हिडिओ पोस्ट केला होता. म्हणून लोकांनी त्याचे दुकान फोडले आणि त्याला मारहाण केली. त्याच्या दुकानाचे तुकडे झाल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. Operation Sindoor

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.