परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांच्या सुरक्षेत वाढ

53

S. Jaishankar : भारत-पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2023 मध्ये त्यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. (S. Jaishankar)

(हेही वाचा – ‘ऑपरेशनआधी मला काहीही माहित नव्हते, पण जेव्हा…’; Operation Sindoor नंतर एअर मार्शल एके भारतींच्या वडिलांची भावना)

भारतीय संरक्षण दलांचे ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor), त्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने सीमा रेषेवर सुरू केलेल्या कुरापती आणि ड्रोन हल्ले यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला असला तरी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी नुकताच देशातील महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. दहशतवादी हल्ल्याचा धोका असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत यात निर्णय घेण्यात आला.

गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून निवासस्थानाबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. जयशंकर यांना आधीपासूनच झेड दर्जाची सुरक्षा आहे. सीआरपीएफचे 30 पेक्षा जास्त जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.

(हेही वाचा – Metro विस्ताराला केंद्राचे पूर्ण सहकार्य; राज्यात कुठे आणि कसा होणार विकास ?)

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात मोठी कारवाई करत ५ धाडसी निर्णय घेतले. त्यात सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली. २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा जीव गेला होता. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. दहशतवाद्यांना कुठल्याही किंमतीत सोडणार नाही. असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. या हल्ल्याच्या १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदुर अंतर्गत पाकिस्तानच्या ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. यात पाकच्या १०० किमी आत जाऊन भारतीय सैन्याने दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.