Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरपूर्वी मला काहीही माहित नव्हते, पण जेव्हापासून मला हे कळाले तेव्हापासून मला खूप अभिमान वाटतो, अशा भावना एअर ऑपरेशन महासंचालक एअर मार्शल एके मार्शल यांचे वडील जीवछलाल यादव यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, वर्तमानपत्रात प्रकाशित जेव्हा ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती प्रकाशित होऊ लागली तेव्हा मला खूप अभिमान वाटला. तो देशासाठी जे काही करत आहे याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत मुलाने देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
(हेही वाचा CJI BR Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथबध्द; असा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास )
Operation Sindoorद्वारे भारताने स्वतःचे नाव कमावले असून आपल्या देशाचे कौतुक होत आहे याचा मला खूप आनंद आहे. माझ्या मुलाने त्याचे नेतृत्व केले याचा मला आनंद आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा यशस्वीरित्या उध्वस्त करणाऱ्या ऑपरेशन सिंदूरच्या यशात एअर मार्शल ए.के. भारती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दि. ०९ मे आणि १० मे रोजी झालेल्या प्रत्युत्तर हवाई हल्ल्यात हवाई दल आणि इतर सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील ०९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली.
त्याचबरोबर, पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांना आणि पायाभूत सुविधांना नुकसान पोहोचवून भारतीय सशस्त्र दलांनी शौर्य आणि ताकद दाखवली. याच महत्त्वपूर्ण ऑपरेशन(Operation Sindoor)मध्ये हवाई दल अधिकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल एअर मार्शल ए.के. भारती यांच्या कुटुंबाने खूप आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. एअर मार्शल ए.के. भारती यांचे वडील जीवछलाल यादव म्हणाले की, त्यांना त्यांच्या मुलाच्या देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप अभिमान आहे. Operation Sindoor
Join Our WhatsApp Community