भारतासमोर पाकिस्तान नरमला; चुकून पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेल्या BSF जवानाला मुकाटपणे भारताच्या स्वाधीन केले

168
पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम कुमार साहू (Poornam Kumar Sahu) यांची पाकच्या ताब्यातून २० दिवसांनी सुटका झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना, २३ एप्रिल रोजी पूर्णम कुमार साहू यांना आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते. त्या दिवसांपासून या जवानाला भारतात परत आणण्यासाठी भारत-पाकमध्ये देशामध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या. दरम्यान १४ मे रोजी या जवानांची पाकमधून सुटका झाली. (BSF)

(हेही वाचा – वर्सोव्यातील राजे निवास अनधिकृत; BMC ने चालवला हातोडा )

शांततापूर्ण हस्तांतरण
बीएसएफ जवान पूर्णम कुमार साहू २३ एप्रिल २०२५ पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १०.३० वाजता अमृतसरमधील संयुक्त चेक पोस्ट अटारी (Atari Check Post) मार्गे साहूला भारताच्या ताब्यात देण्यात आले. बीएसएफच्या प्रवक्त्याने माहिती दिली आहे की भारत आणि पाकिस्तानमधील हे हस्तांतरण शांततेत पूर्ण झाले.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
दरम्यान बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार साहू हे पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये तैनात होते. २३ एप्रिल रोजी, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या सुरुवातीच्या काळात, बीएसएफ जवानाने चुकून झिरो लाईन ओलांडली. (Zero line cross) यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी (Pakistani Rangers) त्या बीएसएफ जवानाला (BSF jawan)  ताब्यात घेतले आहे. (BSF)
(हेही वाचा – NCP : “राष्ट्रवादी समोर निवडणुकीआधी अडचणी वाढल्या; शहराध्यक्षांचा राजीनामा”)
भारताच्या ताब्यात पाकिस्तानी जवान
भारतीय सुरक्षा दलांनी ३ मे रोजी राजस्थानमध्ये एका पाकिस्तानी रेंजर्स सैनिकाला अटक केली होती. बीएसएफने श्रीगंगानगरमधील सीमेजवळ ही अटक केली. वृत्तानुसार, पाकिस्तानी रेंजर्सचा सैनिक भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्याला थांबवले आणि ताब्यात घेतले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.