मुंबईतील चांदिवली येथील Mock Drill च्या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

270
मुंबईतील चांदिवली येथील Mock Drill च्या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • प्रतिनिधी 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव निर्माण झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी पोलीस आणि सरकारी यंत्रणांकडून मॉक ड्रिलचे (Mock Drill) आयोजन करण्यात येत आहे. मुंबईतील साकिनाका पोलिसांकडून मंगळवारी नाहर अमृत शक्ती, डी मार्ट, चांदीवली येथे घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये हे केवळ मॉक ड्रिल (आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सराव) असल्याचे साकिनाका पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Pakistan High Commission: भारताने पाकविरुद्ध केली कडक कारवाई; पाक अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश)

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरातील अतिसंवेदनशील भाग, रेल्वे स्थानक, मॉल, धार्मिक आणि पर्यटन स्थळ तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ (Mock Drill) चे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात येत आहे. याच एक भाग म्हणून साकिनाका पोलिसांकडून मंगळवारी दुपारी १२ वाजता नाहर अमृत शक्ती, डी मार्ट, चांदीवली या ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. साकिनाका पोलीस, एनएसजी कमांडो, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांनी या मॉक ड्रिल मध्ये सहभाग घेऊन आपत्कालीन परिस्थितीत किंवा दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनांना तोंड देण्यासाठी सराव करण्यात आले.

(हेही वाचा – CJI BR Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथबध्द; असा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास)

मॉक ड्रिलची स्थानिक नागरिकांना पूर्वकल्पना नसल्यामुळे शस्त्रधारी पोलीस फोजफाटा तसेच रुग्णवाहिका बघून काही तरी भलतं घडतंय असा स्थानिकांना संशय आल्याने एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी इमारतीच्या खिडकीतून मोबाईलच्या कॅमेरामध्ये व्हिडीओ काढून सोशल मीडियावर ते व्हिडीओ व्हायरल करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की मुंबई हाय अलर्टवर आहे. एका संदेशात लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, कारण शहरावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, एनएसजी कमांडोंनी घाटकोपरमधील असल्फा, साकिनाका आणि जागृती नगर येथील मेट्रो स्टेशन पूर्णपणे सुरक्षित केले आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या व्हायरल व्हिडिओबाबत साकिनाका पोलिसांनी लोकांना आवाहन केले की, कोणीही घाबरून जाऊ नये, हे मॉक ड्रिल (Mock Drill) आहे, एक प्रकारचा सराव असून पोलीस तसेच सरकारी यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रात्यक्षिके घेण्यात आले होते असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.