-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या के (पश्चिम) विभाग कार्यालयाच्यावतीने वेसावे (वर्सोवा) गावठाण येथील एका बहुमजली अनधिकृत इमारतीवर मंगळवारी १३ मे २०२५ रोजी कारवाई करण्यात आली. येथील रामसे मार्गावर चार मजली राजे निवास ही इमारत अनधिकृत बांधल्याने या प्रकरणी कारवाई करून महापालिकेने यावर हातोडा चालवत ही बहुमजली इमारत जमीनदोस्त केली. मुंबई महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (के पश्चिम) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात के पश्चिम विभागातील विविध भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. (BMC)

(हेही वाचा – Pakistan High Commission: भारताने पाकविरुद्ध केली कडक कारवाई; पाक अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश)
मागील आठवड्यात वर्सोवा भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील (कोस्टल रेग्यूलेशन झोन – सीआरझेड) पाच अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर वेसावे गावठाण परिसरात काल कारवाई करण्यात आली. रामसे मार्गावरील ‘राजे हाऊस’ नामक तळमजला अधिक ४ मजल्यांची इमारत अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ३ हजार चौरस फूट इतके या इमारतीचे क्षेत्रफळ होते. ८ हँड ब्रेकर, १ गॅस कटर तसेच १ जनरेटरच्या सहाय्याने सदर इमारत निष्कासित करण्यात आली. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेच्या १४ अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (BMC)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=qOU2ARGQByE
Join Our WhatsApp Community