Pakistan High Commission: भारताने पाकविरुद्ध केली कडक कारवाई; पाक अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश

154
Pakistan High Commission : नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला भारताने पर्सना नॉन ग्राटा (Persona non grata) घोषित केले आहे. संबंधित अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले आहे. हा पाकिस्तानी अधिकारी त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरील इतर संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी होत असल्याने भारताने ही कारवाई केली आहे. या कृत्याच्या स्वरूपाबद्दल अधिक माहिती उघड करण्यात आलेली नाही. (Pakistan High Commission)

(हेही वाचा – भारतीय वंशाच्या Anita Anand कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदी, भगवतगीतेवर हात ठेवून घेतली शपथ)

पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा अधिकारी हा गुप्तचर कारवायांमध्ये सामील असेल किंवा अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करत असेल तर 1961 च्या व्हिएन्ना करारान्वये तो देश संबंधित अधिकाऱ्यावर अशा प्रकारची कारवाई करू शकतो. हा निर्णय भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये वाढत्या तणावाचे संकेत देतो.

(हेही वाचा – IMD Monsoon Update : राज्यातील विविध भागांत यलो तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी)

दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, २३ एप्रिल रोजी, भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर राजनैतिक पावले उचलली, ज्यात नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांची संख्या ५५ ​​वरून ३० पर्यंत कमी करणे समाविष्ट होते. याशिवाय, भारताने सर्व पाकिस्तानी संरक्षण सल्लागारांनाही हद्दपार केले आणि त्यांना एका आठवड्याच्या आत देश सोडण्यास सांगितले. भारताने इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातून आपले संरक्षण सल्लागार मागे घेतले आणि राजदूतांची संख्या कमी केली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.