भारतीय वंशाच्या Anita Anand कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदी, भगवतगीतेवर हात ठेवून घेतली शपथ

100

Anita Anand : कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मंगळवारी १३ मे ला पूर्णपणे नवीन मंत्रिमंडळ जाहीर केले. हे मंत्रीमंडळ कॅनडाला ‘नवीन दिशेने’ घेऊन जाण्यास सज्ज आहे. असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मार्क कार्नीयांच्या नवीन मंत्रीमंडळात २८ कॅबिनेट मंत्री आणि १० राज्य सचिवांचा समावेश आहे. या मंत्री मंडळात परराष्ट्रमंत्री म्हणून भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Anita Anand)

पहिल्यांदाच हिंदू महिला कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून घेतली शपथ

अनिता आनंद यांनी मंगळवारी गीतेवर हात ठेवून मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिपदी त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला आहेत. अनिता आनंद यांच्यामुळे कॅनडासोबत भारताचे बिघडलेले संबंध सुधरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅनडाचे अमेरिकेसोबतही संबंध बिघडलेले आहेत. यामुळे अनिता आनंद यांना मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत.

(हेही वाचा – Sitaram Gupta ED Raids : वसई-विरारमधील ४१ अनधिकृत इमारतीप्रकरणी ईडीची धडक कारवाई)

जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानीवादींच्या विचारांशी जवळीक करत भारताशी वाकडे घेतले होते. कॅनडामध्ये जून, जुलैमध्ये निवडणूक होणार होती. परंतू त्यापूर्वीच ट्रुडो यांची लोकप्रियता घसरू लागली होती. याचा फटका बसू नये म्हणून त्यांच्या पक्षाने ट्रुडो यांना पायउतार होण्यासाठी दबाव आणला होता. ट्रुडो जानेवारीदरम्यान पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी मार्क कार्नी यांच्याबरोबरच अनिता आनंद यांचेही नाव चर्चेत होते. परंतू, पक्षाने मार्क कार्नी यांना पंतप्रधान पदासाठी संधी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.