Operation Sindoor : शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या निवासस्थानी सीसीएसची उच्चस्तरीय बैठक

Operation Sindoor नंतर सुरक्षा समितीची कॅबिनेट बैठक होत असून या बैठकीत दहशतवाद आणि पाकिस्तान यावर चर्चा होणार आहे. शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच सुरक्षा समितीची कॅबिनेट बैठक होत असून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारत आपली लढाई तीव्र करणार आहे आता स्पष्ट झाले आहे.

46

Operation Sindoor नंतर सुरक्षा समितीची कॅबिनेट बैठक होत असून या बैठकीत दहशतवाद आणि पाकिस्तान यावर चर्चा होणार आहे. शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच सुरक्षा समितीची कॅबिनेट बैठक होत असून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारत आपली लढाई तीव्र करणार आहे आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची कॅबिनेट बैठक असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण उपस्थित आहेत.

केंद्र सरकारने म्हटले आहे की, दहशतवाद हा एक असा मुद्दा आहे ज्यावर तडजोड केली जाणार नाही आणि पाकिस्तानसोबत युद्धबंदीबाबत एक करार झाला आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीवर सहमती झाली असली तरी, तणावाची परिस्थिती कायम आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या कारवाईकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधलं गेलं. त्यातच आता बुधवारी केंद्रात मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत.

(हेही वाचा ‘Operation Sindoor’नंतर ‘त्या’ १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर वाढला दबाव; नेमकं कारण आलं समोर )

शस्त्रसंधीनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील परिस्थिती पाहता, बुधवार हा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सीसीएस बैठकीला उपस्थित राहतील. यासोबतच आणखी महत्त्वाच्या बैठकादेखील आज होणार आहेत. याकडेही देशाचं लक्ष असेल. पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या उच्चस्तरीय बैठकीत नेमकं काय होणार यासंबंधी लवकरच खुलासा होण्याची शक्यता आहे. Operation Sindoor

Operation Sindoor अंतर्गत भारताची मोठी कारवाई

भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील ०९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सैन्याने प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. त्याचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त झाले. पाकिस्तानने स्वतः कबूल केले की त्यांना नुकसान सहन करावे लागले.

विशेष म्हणजे तणावाच्या परिस्थितीतूनही पाकिस्तान सुधारण्यास तयार नाही. एका वृत्तानुसार, शाहबाज शरीफ सरकार प्रत्युत्तराच्या कारवाईत मारल्या गेलेल्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाच्या कुटुंबाला १ कोटी रुपये भरपाई म्हणून देईल.यावरून असे स्पष्ट होते की, पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देतो. याचा पुरावा त्यांनी स्वतः याकृतीतून दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.