Double decker bridge : मुंबई उपनगरातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. दरम्यान वसई-विरारला सध्या दोनच मार्ग आहेत. येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी तर दुसऱ्या बाजूला रेल्वेवर प्रवास करताना लोकलमध्ये प्रवाशांना कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे नायगाव-भाईंदरदरम्यानच्या खाडीवर नवा पूल उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. याबाबत बहुजन विकास आघाडी पक्षाचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर (Former MLA Hitendra Thakur) यांच्या या मागणीला यश आले असून आता महाराष्ट्र शासन व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने वसई खाडीवर प्रथमच रोड आणि रेल्वे वाहतुकीसाठी डबल डेकर पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईपासून विरारपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ, वेगवान व सुसंगत होणार आहे. (Double decker bridge)
(हेही वाचा – ‘Operation Sindoor’नंतर उद्ध्वस्त झालेल्या हवाई तळांचे सॅटेलाइट PHOTOS व्हायरल; धावपट्टी आणि इमारती झाल्या उद्ध्वस्त)
ही बहुउद्देशीय योजना उत्तन विरार सागरी सेत् (यूव्हीएसएल) व मिरा रोड-विरार मेट्रो लाइन १३ या दोन मोठ्या प्रकल्पांना एकत्र आणून पूर्ण केली जाणार आहे. वसई खाडीवर सुमारे पाच कि.मी. लांबीचा हा डबल डेकर पूल उभारण्यात येणार असून, या पुलाच्या वरच्या भागावर मेट्रो मार्ग तर खालच्या स्तरावर आठ लेनचा महामार्ग असणार आहे.
औद्योगिक विकासालाही चालना
डबल डेकर असलेल्या या पुलामुळे केवळ प्रवासच नव्हे, तर औद्योगिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल. उत्तर मुंबई महानगर क्षेत्रातील विकासासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. शिवाय, हा पूल दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेशी थेट जोडला जाणार असल्यामुळे लॉजिस्टिक नेटवर्क अधिक मजबूत होईल.
महत्त्वाची वैशिष्ट्ये :
एकूण लांबी: ४.९८ कि.मी.
रुंदी: ३०.६० मीटर
वरील स्तर : मेट्रो मार्ग (लाइन १३)
खालचा स्तर आठ लेन महामार्ग
मुख्य निधीपुरवठा : जेआयसीए
कार्यान्वयन संस्था : एमएमआरडीए