-
प्रतिनिधी
बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई जिल्हा बँक ५ लाखापर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी केली. फोर्ट येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित भव्य कार्यशाळेत बार्टीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (Education)
या कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, बार्टीचे संचालक सुनील वारे, कुणाल कांबळे, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे, नगरसेवक ईश्वर तायडे, पत्रकार उदय तानपाठक यांच्यासह बार्टीचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. आयआयटी आणि एनआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कर्ज सुविधा देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (Education)
(हेही वाचा – Rain Update : खुशखबर; मान्सूनचा जलद प्रवास अंदमानात!)
आ. दरेकर म्हणाले, “मुंबई बँक नेहमीच शिक्षण आणि शैक्षणिक कर्जासाठी आग्रही आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षणाच्या शक्तीवर विश्वास ठेवून समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.” त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचे सांगितले आणि समाजन्यूनतम व्याजदरात कर्ज देण्यासाठी धोरण तयार करू. बार्टीच्या विद्यार्थ्यांना ५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Education)
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या प्रगतीसाठी बँक सर्वतोपरी सहकार्य करेल. बाबासाहेबांचे विचार आणि आदर्श आत्मसात करून विद्यार्थ्यांनी यश मिळवावे. बार्टीला बँकेचे पूर्ण सहकार्य राहील.” यासाठी शासनस्तरावर बैठका घेऊन आवश्यक ती मदत मिळवली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. (Education)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community