IPL 2025 : उर्वरित आयपीएलसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात येणार की नाही?

IPL 2025 : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णयाचं स्वातंत्र्य खेळाडूंना दिलं आहे.

38
IPL 2025 : उर्वरित आयपीएलसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात येणार की नाही?
  • ऋजुता लुकतुके

येत्या १७ मेपासून आयपीएलचा थरार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे मधला एक आठवडा ही स्पर्धा स्थगित करावी लागली होती. आता बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक जारी केलं असून ३ जूनला स्पर्धेचा अंतिम सामना होणार असल्याचं यात म्हटलं आहे. त्याचबरोबर आयपीएल प्रशासनाने फ्रँचाईजींना परदेशी खेळाडू परत बोलावण्याचे निर्देशही लगोलग दिले. पण, ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात परतण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत. दिल्ली कॅपिटल्सच्या मिचेल स्टार्कने तर आधीच तसे संकेत दिले आहेत. (IPL 2025)

अशावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाही खेळाडूंच्या बाजूने उभी राहिली आहे. ‘ज्या खेळाडूंना भारतात परतण्याची इच्छा नाही, त्यांच्यावर बळजबरी करता येणार नाही,’ असं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे. येत्या ११ जूनला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी लॉर्ड्सवर होणार आहे. ती किनारही या निर्णयाला आहे. कारण, ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला करणार आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – UPI Payment Service : देशभरात काही ठिकाणी युपीआय सेवा बंद; ग्राहकांना न घाबरण्याचं एनपीएसआयचं आवाहन)

आयपीएलचे अजून १३ सामने बाकी आहेत आणि ते संपल्या संपल्या ८ दिवसांत कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सावध भूमिका घेतली आहे. शिवाय खेळाडूंची तंदुरुस्ती आणि सुरक्षितता यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ‘आयपीएलसाठी भारतात परतायचं की नाही, याचा निर्णय खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय असेल. जे खेळाडू भारतात परततील, त्यांच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेगळी योजना तयार करेल. आम्ही बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियन सरकारशी संपर्कात आहोत. खेळाडूंची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे,’ असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. (IPL 2025)

त्यामुळे आता किती ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमध्ये परततात यावर प्रश्नचिन्ह आहे. जोश हेझलवूड दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. तर मिचेल स्टार्क येण्यासाठी उत्सुक नाही. त्यामुळे बंगळुरू आणि दिल्ली फ्रँचाईजींना हा धक्का आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.