Virat Kohli Retires : पत्नी अनुष्का शर्माने लिहिला विराटसाठी भावपूर्ण संदेश

Virat Kohli Retires : ‘मैदानावर खेळत खेळत निवृत्त व्हायला हवं होतं.’ असं अनुष्का म्हणते. 

48
Virat Kohli Retires : पत्नी अनुष्का शर्माने लिहिला विराटसाठी भावपूर्ण संदेश
  • ऋजुता लुकतुके

सोमवारी विराट कोहलीने कसोटीतून निवृत्तीची जाहीर करून सगळ्यांनाच धक्का दिला. त्याच्या निर्णयानंतर पत्नी अनुष्का शर्माने एक भावनिक पोस्ट शेअर केली. तिने तिच्या इंस्टाग्रामवर विराटसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही स्टेडिअममध्ये दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य आहे. क्रिकेटच्या मैदानावर दोघांचा एकत्र फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले की, तुझे असंख्य विक्रम आणि कारकिर्दीतील टप्पे याविषयी बोलतील. पण, तू कधीही न दाखवलेले अश्रू, खेळाच्या या फॉरमॅटसाठी तुझ्या मनात असलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आहेत. (Virat Kohli Retires)

अनुष्का शर्मा पुढे लिहिते, मला माहिती आहे या दरम्यान तू काय काय गमावलं आहेस. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तू थोडा अधिक समजदार, थोडा अधिक नम्र झालास आणि तुला या सगळ्या प्रवासातून प्रगल्भ होताना पाहणं हे माझं भाग्य आहे. मला नेहमीच वाटायचे की तू कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होशील, पण तू नेहमीच तुझ्या मनाचं ऐकलं आहेस आणि म्हणूनच ‘माय लव्ह’ मी एवढंच सांगेन की, तू खेळाच्या या फॉरमॅटमध्ये आज सर्व काही मिळवलं आहेस.” (Virat Kohli Retires)

(हेही वाचा – India-Pakistan Tensions : भारत – पाक तणाव निवळला असला तरी अर्थव्यवस्थेवर होणार ‘हा’ परिणाम)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅगी ब्लू’ प्रथमच परिधान करून आज १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या. (Virat Kohli Retires)

भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळं स्थान असतं. कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा, दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉरमॅट आहे. हा फॉरमॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो, जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो.

या फॉरमॅटपासून दूर जाणं सोपं नाही, पण हा निर्णय आता योग्य वाटतोय. मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलं, पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त; अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळाने मला परत दिलंय.

मी कृतज्जतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे. या खेळासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय, माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञताच आहे

मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहीन! (Virat Kohli Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.