ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताच्या सैन्याच्या तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद देऊन भारताने ३५ पाक सैनिक आणि १०० हुन अधिक दहशतवादी ठार केल्याचे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानचा लष्करप्रमुख मुल्ला आसिफ मुनीरने स्वतःचे कातडी वाचवण्यासाठी चक्क धादांत खोटे पाकिस्तानी जनतेला सांगितले. त्यावेळी बोलताना मुनीर म्हणाला, भारताच्या हल्ल्यात केवळ ११ सैनिक ठार झाले आहेत मुल्ला मुनीर सध्या स्वतःचे अपयश लपवण्यासाठी असा खॊट्याचा आधार घेत आहे.
(हेही वाचा – Maharashtra SSC Results 2025 : मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा दहावीचा निकाल शत-प्रतिशत )
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर (Pak Army Chief Gen Syed Asim Munir) म्हणाले की, भारताने 6-7 मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये घुसत भारताने 9 दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर 7 ते 10 मे रोजी ड्रोन आणि मिसाईलने अनेकदा हल्ले केले. यावेळी भारताने केलेल्या कारवाईत 11 एयरबेस उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान भारताच्या तिन्ही सेनादल प्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये म्हटले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने 35 ते 40 जवान आणि 100 दहशतवादी मारल्याचे म्हटले आहे. मात्र पाकचे लष्करप्रमुख मुल्ला मुनीर म्हणाला, की भारताने फक्त 11 जवानच मारले आहेत. यामध्ये 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशी खोटी माहिती पाकच्या लष्करप्रमुखानी दिली.
पाकचे ‘हे’ अधिकारी कारवाईत ठार
तसेच भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे टॉपचे अधिकारी ठार झाल्याची माहिती दिली. त्यानुसार, पाकिस्तानी लष्कराचे अब्दुल रहमान, दिलावर खान, इकरामुल्ला, ख़ालिद, मुहम्मद अदील अकबर, आणि निसार मारल्या गेले. तर पाकिस्तानी हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ, मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, नजीब, कॉर्पोरल टेक्नेशियन फारूक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ मुबाशिर हे ठार झाले. पाकिस्तानचे स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफ यांच्यासह पाकिस्तानी हवाई दलाचे एकूण 5 हवाई दलाचे सैनिक मारल्या गेले. ते सर्व सिंध प्रांतातील जकोकाबाद एअरबेसवर (Jacobabad Airbase) तैनात होते. उस्मान आणि त्याचे साथीदार हे जेएफ-17 लढावू विमानाच्या सहाय्याने भारताविरोधात कारवाईची तयारी करत होते. तेव्हाच भारताने शहबाज ए्अरबेसवर हल्ला चढवला.
(हेही वाचा – Virat Kohli Retires : विराटच्या निवृत्तीवर भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेलनी लिहिली ही ह्रदयस्पर्शी मानवंदना)
10 मे रोजी भारत-पाकिस्तानात युद्ध विराम
सलग तीन दिवसांच्या कारवाईनंतर पाकिस्ताने युद्ध विरामासाठी जगातील अनेक देशांकडे मदतीची याचना केली. पाकच्या डीएमओने भारताच्या डीएमओला फोन केला. दोन्ही देशांनी पाकिस्तान युद्ध विरामाला सहमती दर्शवली. अर्थात यानंतर ही पाकिस्तानची वाकडी शेपूट पुढे आली. त्यानंतर पुन्हा तीन तासानंतर युद्ध विरामाचे उल्लंघन करण्यात आले. भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. जर युद्ध विरामाला अजून काही तास उशीर झाला असता, तर कराची बंदर कचऱ्याच्या ढीगात रुपांतरीत झाले असते. भारताने केलेल्या कारवाईचे सर्व पुरावे सादर केले. त्यामुळे जागतिक मंचावर पाकची चांगलीच नाचक्की झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community