
-
ऋजुता लुकतुके
माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रेग चॅपेल यांची भारतीय प्रशिक्षक म्हणून कारकीर्द तशी वादग्रस्तच ठरली. पण, त्यांना भारतातीय संघातून स्टार संस्कृती हद्दपार करायची होती. तंदुरुस्तीसाठी त्यांनी यो यो टेस्ट आणली. स्टार असूनही ग्रेग चॅपेल यांच्या संघाच्या कल्पनेत बसणारा एक भारतीय खेळाडू त्यांना आढळला तो विराट कोहली. त्याच्याविषयी आणि त्याच्या सरावाच्या पद्धतीबद्दल ते भरभरून बोलायचे. आता विराट कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर तर त्यांनी विराटवर एक १००० शब्दांचा भावपूर्ण संदेशच लिहिला आहे. पण, त्यातून विराटबद्दलचं त्याचं प्रेम आणि त्यांना भावलेले त्याच्यातील गुण समोर येतात, जे इतरांनीही समजून घेण्यासारखे आहेत. विराटच्या निवृत्तीच्या निमित्ताने ग्रेम चॅपेल यांनी विराटला लिहिलेलं हे खुलं पत्र पाहूया,
ज्वालामुखीसारख्या धगधगत्या युगाचा अंत
“विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती ही केवळ एका कारकिर्दीचा अंत नाही, तर एका ज्वालामुखीसारख्या धगधगत्या युगाचा अंत आहे. असा ज्वालामुखी ज्यामध्ये जिद्द होती, आक्रमकता होती आणि आत्मविश्वास होता. भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर सर्वात मोठा बदल घडवणारा खेळाडू जर कोणी असेल, तर तो विराटच. काही बाबतीत त्याने सचिनलाही मागे टाकलं. विशेषतः भारतीय क्रिकेटची मानसिकता विराटने बदलून टाकली. विराट केवळ धावा करणारा फलंदाज नव्हता, तो भारतीय क्रिकेटचा धडकी भरवणारा, धगधगता आत्मा होता. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – ‘विशेष अधिवेशन होऊ द्या… पण संरक्षण चर्चा मर्यादित ठेवा’; Sharad Pawar यांचा सूचक इशारा, एनडीएतील मतभेद वाढले!)
त्याने केवळ भारतीय क्रिकेटचा खेळ बदलला नाही, तर भारतीय क्रिकेटची मानसिकताच बदलून टाकली. आत्मविश्वासाने भरलेली, कोणालाही न घाबरणारी, कोणापुढेही न झुकणारी भारतीय क्रिकेटची प्रतिमा त्याने निर्माण केली. दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या कोहलीने केवळ धावा केल्या नाहीत, त्याने अपेक्षांची परिभाषाच बदलली, चालत आलेल्या परंपरांना आव्हान दिले आणि २१व्या शतकातील आत्मविश्वासू, निःस्वार्थ भारताचे प्रतिक म्हणून काम केले. त्याच्या निवृत्तीने केवळ आकडेवारीची पोकळी निर्माण झाली असं नाही तर भारतीय क्रिकेट संघाच्या उर्जेवरही परिणाम झाला. कारण त्याच्यासारखा दुसरा खेळाडू कोणीच नाही.
विराटने आक्रमकतेची आग पेटवली कधी काळी भारतीय क्रिकेट संघा परदेशात दडपणात खेळायचा. भारतीय संघ तांत्रिकदृष्ट्या सक्षम असला तरी त्या संघात आत्मविश्वास कमी असायचा. मात्र सौरव गांगुलीनं हे चित्र बदललं आणि भारतीय संघाला नवा कणा आणि नवा बाणा दिला. मग कॅप्टन धोनीने त्याच्या कूल नेतृत्त्वात टीम इंडियाला मर्यादित षटकांमध्ये मोठं यश मिळवून दिलं. पण विराट??? विराट कोहलीने भारतीय संघात आक्रमकतेची आग पेटवली. विराटने जुना इतिहास पुसला आणि स्वत: नवा इतिहास लिहायला घेतला. जिथे भारत केवळ ‘मॅच खेळतो’ नव्हे, तर ‘मॅच जिंकतो’ अशी अपेक्षा असते. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – Cabinet Decision : एका क्लिकवर वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील ६ मोठे निर्णय)
विराट कोहली हा ऑस्ट्रेलियन नसलेला, भारतीय “ऑस्ट्रेलियन” खेळाडू होता, सफेद कपड्यातील वॉरियर. असा योद्धा जो प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडला, कधीही मागे हटला नाही, बॅटिंग, फिल्डिंग आणि वेळ पडल्यास बोलिंग अशा प्रत्येक गोष्टीत १०० टक्के देणारा योद्धा. स्वत: १०० टक्के देताना तो इतरांनीही शंभर टक्केच द्यायला हवेत यासाठी आग्रही असणारा योद्धा. कोहलीच्या टेस्ट कारकिर्दीतील दोन मालिका त्याची महानता आणि त्याची समर्पकतेची उदाहरणं आहेत. एक आहे २०१४ ची इंग्लंडमधील पराभवाची आणि दुसरी आहे २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात मिळवलेली ऐतिहासिक मालिका विजयाची.
२०१४ मध्ये इंग्लंडमध्ये जेम्स अँडरसनने विराटच्या कमकुवत बाजूंना उघडं पाडलं. पण अपयश हे विराटसाठी राख होती, त्या राखेतून विराटने फिनिक्स भरारी घेतली. विराटने आपल्या कमकुवत बाबींवर काम केलं, तो परत कामाला लागला, सराव करत राहिला. त्यासाठी त्याने आपल्या जुन्या प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेतलं, सचिनकडून सल्ला घेतला, आणि स्वतःला नव्यानं घडवलं. 2018 मध्ये त्याच इंग्लंडच्या भूमीवर, त्याने ५९३ धावा ठोकत, चार वर्षापूर्वीचं अपयश धुवून तर काढलंच, पण नवा मॅच्युर कोहली जगाला पाहायला मिळाला. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – ठाकरे गटाला धक्का: Tejasvee Ghosalkar यांचा शिवसेनेतून राजीनामा, दहिसरमध्ये बंडखोरी!)
२०१८ मध्ये इंग्लंडमध्ये त्याचे पुनरागमन हे एक अद्भुत कथानक होते. एजबॅस्टनच्या पहिल्या कसोटीत कोहलीने तुफानी १४९ धावा केल्या. ज्या आऊडसाईड ऑफ स्टम्पवर विराट बाद होत होता, त्याच चेंडूंवर तो चौकार ठोकू लागला. विराटचे दुसऱ्या डावातील अर्धशतकही कमी मौल्यवान नव्हते. पाच कसोटी सामन्यांमध्ये, त्याने ५९.३० च्या सरासरीने ५९३ धावा केल्या, जो दीर्घकाळात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
मग ऑस्ट्रेलिया मालिका ही तर विराटच्या राज्याभिषेकाची भूमी होती. भारताने कधीही ऑस्ट्रेलियात टेस्ट मालिका जिंकलेली नव्हती. पण विराटच्या नेतृत्वाखालील संघानं ते करून दाखवलं. त्याची १२३ धावांची खेळी ही अत्यंत कठीण खेळपट्टीवर केलेली लाजवाब खेळी होती. कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च जिद्द आणि शिस्तीचं प्रतीक होती. त्यानंतर तो टीम इंडियाचा कर्णधार बनला होता. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – J&K terrorist encounter: ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार)
विराट कोणत्याही मालिकेसाठी केवळ फिटनेस किंवा शरीरानेच नव्हे, तर इमॅजिनेशन अर्थात कल्पनाशक्तीनेही तयार व्हायचा. इतर खेळाडू परिस्थिती घडल्यावर प्रतिसाद देत, पण कोहली आधीच ते ओळखायचा. डाव सुरू होण्यापूर्वीच तो त्याची कल्पना करायचा. दबाव येण्याआधीच तो त्या अनुभवून गेलेला असायचा. हेच होतं त्याचं खऱ्या अर्थाने ‘सुपरपॉवर’.
त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी म्हणजे केवळ धावा नव्हे, त्या एक स्टेटमेंट असायच्या. अॅडलेडमधील १४१, सेंच्युरियनमधील १५३, वेस्ट इंडिजमधील २००, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं २५४* — ह्या सगळ्यांनी त्याच्या फलंदाजीची विविध रूपं दाखवली. तो ‘Feel’वर खेळणारा फलंदाज होता. टायमिंग शॉट, स्ट्रोक, सरळ बॅटने खेळलेले ड्राइव्हसने त्यांच्या तंत्राला सौंदर्याची जोड दिली. साचेबद्ध नवनवीन फटके त्याच्या खेळात नव्हते, पण त्याचं पारंपरिक तंत्र युद्धाच्या आवेशात उतरायचं. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – एसटी महामंडळामध्ये लवकरच मेगाभरती होणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची माहिती)
तो “फील”वर खेळणारा फलंदाज होता – ताकदीनं नव्हे तर अचूक टाइमिंगवर त्याचा भर असायचा. जड बॅट्स कधीच त्याला आवडल्या नाहीत. त्याऐवजी तो दोन्ही हातांनी, टेनिससारखी आक्रमकता घेऊन स्लो पिचवर खेळायचा, ज्यामुळे त्याचे स्ट्रेट ड्राइव्हसुद्धा दुसऱ्या जगातून आलेल्या शॉटसारखे भासत. त्याला क्वचितच नविन प्रयोगांची गरज पडायची – ना स्कूप्स, ना रिव्हर्स स्वीप्स. त्याचं खरं कौशल्य होतं पारंपरिक तंत्राला रणांगणातील जिद्दीशी एकत्र जुळवण्याचं.
कोहलीची मानसिक तयारी ही एक अद्भुत गोष्ट होती. वैयक्तिक असो वा व्यावसायिक, प्रत्येक अपयशानंतर तो पुढे गेला आणि अधिक कणखर, अधिक लक्ष्यभेदी आणि अधिक मॅच्युअर होत गेला. २००६ मध्ये रणजी सामन्यादरम्यान त्याच्या वडिलांचे निधन हा एक निर्णायक क्षण राहिला. मात्र त्यावेळी त्याने माघार घेतली नाही. त्याने फलंदाजी केली आणि एका अटीतटीच्या डावात ९० धावा केल्या – कारण त्याच्या वडिलांना तेच हवे होते. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – कोकणातील Alphonso Mango चा हंगाम अंतिम टप्प्यात)
२००८ मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कप विजेता कर्णधार म्हणून तो क्रिकेट जगाताला परिचीत झाला. अनेकांना वाटलं की याचा दिखावा फार काळ टिकणार नाही. पण त्यानं हे सगळं चुकीचं ठरवलं — कठोर प्रामाणिकपणाने, नवे बदल स्वीकारत तो पुढे जात राहिला. त्याने आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल केले — आहार, फिटनेस, मानसिक तयारी. आणि त्याचं रूपांतर एका आधुनिक भारतीय क्रिकेटपटूत झालं — व्यावसायिक दृष्टिकोन असलेला, अत्यंत तंदुरुस्त, आणि मानसिकदृष्ट्या अजोड क्रिकेटर.
विराट कोहली म्हणजे नव्या भारताचं प्रतिबिंब होता — जागतिक विचारसरणी असलेला, पण आपल्या मुळांशी घट्ट जोडलेला. त्याचं स्टारडम आणि आयपीएलचा उदय एकाच वेळी घडलं, पण त्याने कधीच टेस्ट क्रिकेटचं महत्त्व कमी होऊ दिलं नाही. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – BMC : मरोळमध्ये साडेतीन एकर वन वाढले…)
सचिन हा प्रतिभेचा अवतार होता, धोनी मास्टर टॅक्टिशियन — पण विराट? तो स्वत:च एक प्रभाव होता. कारण त्याने केवळ विजय मिळवले नाहीत तर त्याने क्रिकेटची मानसिकता बदलली. त्याने फास्ट बॉलिंगला भारताचं शस्त्र बनवलं. ‘यो-यो टेस्ट’ भारतीय क्रिकेट संस्कृतीत आणलं. आपल्याच गोलंदाजांवर विश्वास दाखवला, स्पर्धकांना भिडला, आणि दुसऱ्या क्रमांकासाठी कधीही खेळला नाही. टेस्ट क्रिकेट टिकावं, प्रबळ व्हावं — यासाठी तो झगडला.
२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये, स्टिव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या चाहत्यांना समजावण्याचा त्याचा प्रयत्न — ही एक थेट ‘राजनैतिक पातळीवरची’ कृती होती. तो तापट होता, पण तरीही तो क्रिकेटचं ‘सुपर-इगो’ बनला. (Virat Kohli Retires)
(हेही वाचा – भारताच्या कारवाईचा लष्करप्रमुख Asim Munirने घेतला धसका, घाबरलेल्या मुनीरला बंकरमध्ये लपविलं)
आज तो टेस्ट क्रिकेटमधून बाहेर पडतो आहे, मागे ठेवतो आहे एक सुवर्णमय कारकीर्द — ९००० हून अधिक धावा, ३० शतकं, परदेशातील ऐतिहासिक विजय. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो एक ‘ब्लूप्रिंट’ देऊन जातो आहे — कसोटी क्रिकेट कसं खेळायचं, अभिमानाने, जिद्दीने आणि मनापासून, अशी ती ब्लू प्रिंट आहे.
तो डौलात चालला, कधीकधी मोठ्याने बोलला, कायम मनापासून खेळला. आणि याच कारणांमुळे तो त्या भारताचं प्रतीक ठरला — जो आता केवळ सहभागी व्हायला नव्हे, तर जिंकण्यासाठीच आलेला असतो.विराट कोहली — एका नव्या भारताचा आवाज.विराट कोहली किंग होता, त्याचं राज्य आता संपलं असेल, पण त्याचा प्रभाव, त्याचं तेज कायम राहील किंग कोहलीला सलाम आणि धन्यवाद विराट, यश आणि सन्मान एकत्र नांदू शकतात याचा आम्हाला विश्वास देण्यासाठी (Virat Kohli Retires)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community