SSC Result 2025 : दहावीचा निकाल जाहीर, यंदा 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण; कोकणाने पुन्हा मारली बाजी

152
SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचे निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येतील, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. निकाल पाहण्यासाठी तुम्ही खालील संकेतस्थळावर भेट देऊ शकता. (SSC Result 2025)

(हेही वाचा – Operation Sindoor : भारताला हवे आहेत ‘हे’ ३ आतंकवादी)


https://results.digilocker.gov.in 
https://sscresult.mahahsscboard.in  
http://sscresult.mkcl.org 
https://results.targetpublications.org 
https://results.navneet.com


निकाल पाहण्याची प्रक्रिया:
  • वरीलपैकी कोणत्याही अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • “SSC Examination March – 2025 Result” या लिंकवर क्लिक करा.
  • आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
  • “View Result” वर क्लिक करा.
  • आपला निकाल स्क्रीनवर दिसेल; त्याची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट घ्या.
तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 21 फेब्रुवारी- 17 मार्च 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा राज्यात दहावी परीक्षा निकाल 94.10 टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 चा निकाल टक्के होता.

 

(हेही वाचा – Weather Update : पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज)

8,844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खासगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण 16,10,908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,87,399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04 आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,585 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 8,844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.27 आहे.
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा?
मंडळाने विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक 14 मे ते 28 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचीही मुभा उपलब्ध करून दिली आहे. पण त्यासाठी त्यांना योग्य ते शुल्क भरण्याची सूचना केली आहे. फेब्रुवारी-मार्च 2025परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे, शुल्क भरणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

(हेही वाचा – Mumbai Threat mail: राज्याच्या आपत्ती निवारण व्यवस्थापण कक्षाला धमकीचा मेल, पोलिसांकडून तपास सुरू)

यंदाच्या दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु. मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.