Mumbai Threat mail : भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत येत्या दोन दिवसात बॉम्ब स्फोट होईल अशी धमकी देणारा मेल आला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा मेल आला आहे. याबाबत महाराष्ट्र नियंत्रण पोलीस कक्षाकडून मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तसेच सोमवार ते बुधवारदरम्यान सतर्क राहण्याचा इशाराही या मेलमधून देण्यात आला आहे. तसेच हा मेल कोणी केला याचा तपास सध्या सुरू करण्यात आला आहे. (Mumbai Threat mail)
मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा मेल नेमका कोणी पाठवला आहे, कोणी खोडसाळपणा केला आहे का, निनावी मेल आहे का, या अनुषंगाने मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. परंतु अद्यापही पोलिसांना याबाबत काही सापडले नाही. मुंबई पोलिसांना अशा प्रकारचे धमकीचे मेल यापूर्वी देखील अनेकवेळा आले आहेत. तसेच खोडसाळपणा करत धमकीचा मेल करणाऱ्यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे, तर काहवेळा दारूच्या नशेत असे मेल करणाऱ्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. त्यानुसार आता या मेलची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. तसेच आरोपीचा शोध लागल्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तसेच या मेलबाबत अधिकची माहिती अशी की, राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा मेल आला आहे. तीन दिवसांत राज्यात किंवा राज्याच्या बाहेर कुठेही हा बॉम्ब ब्लास्ट होईल असे या मेलमध्ये म्हटले आहे. हा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पोलिसांकडून हा मेल कोणी पाठवला याचा तपास केला जात आहे. सोमवार ते बुधवार सतर्क राहण्याच्या सूचना देखील या मेलमधून देण्यात आल्या आहेत. यानुसार पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे.
(हेही वाचा – Operation Sindoor : भारताला हवे आहेत ‘हे’ ३ आतंकवादी)
दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पहेलगाम येथे अतिरेकी हल्ला केला. त्यावेळी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून हिंदू असल्याचे समजल्यावरच त्यांना ठार केले. त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. त्यावर पाकिस्तानने भारतावर उलटवार केले. त्यावर भारताने ७ आणि ८ मे हे दोन दिवस पाकिस्तानवर असे हल्ले केले की, पाकिस्तान पुरता उद्धवस्त झाला. त्यानंतर पाकिस्तान भारतासमोर शरणागती पत्करून शस्त्रसंधीसाठी आर्जव केली. या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भयभीत आणि बिथरलेल्या पाक भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community